उत्तर प्रदेश: मेरठमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. डिलिव्हरी पोहोचवण्यास अवघा ५ मिनिटांचा उशीर झाल्यामुळे एका डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेचं CCTV फुटेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये, लाल रंगाचा टीशर्ट घातलेला एक तरुण अपार्टमेंटमध्ये डिलिव्हरी देण्यासाठी आलेला दिसत आहे. त्याच वेळी एका फ्लॅटमधून एक व्यक्ती बाहेर येते आणि रागाच्या भरात मारायला सुरुवात करते. वाद घालते.
डिलिव्हरी बॉयच्या हातातील मोबाईल हिसकावला
CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, वादादरम्यान त्या व्यक्तीने डिलिव्हरी बॉयच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्याने तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये आरोपी डिलीव्हरी बॉयला कानशिलात मारताना आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. डिलिव्हरी बॉय स्वतःचा मोबाईल परत मागताना दिसत आहे.
डिलिव्हरी बॉयला मारहाण
फ्लॅटमधून एक महिलाही बाहेर येते आणि संपूर्ण घटनेदरम्यान तिथेच उभी राहते. काही वेळानंतर त्या तरुणाला जबरदस्तीने फ्लॅटच्या आत घेऊन जातानाही CCTV मध्ये दिसत आहे. फ्लॅटच्या आत नेऊनही डिलिव्हरी बॉयला मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. काही वेळाने तरुण फ्लॅटमधून बाहेर पडताना दिसत आहे.
१४ ऑगस्ट रोजी घडली घटना
मेरठमधील भावनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'गंगा हाईट्स अपार्टमेंट' मध्ये ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित असं या डिलिव्हरी बॉयचं नाव असून केवळ ५ मिनिटं उशिरा पोहोचल्याच्या कारणावरून त्याला ही अमानुष मारहाण करण्यात आली.
पोलीस तपास सुरू
व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस सध्या व्हायरल व्हिडिओच्या आधारे घटनेची सत्यता, ठिकाण आणि वेळेची सखोल तपासणी करत असून घटनेत सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
शहर
- नागपूर: तरुण पिढी हा देशाचा डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, योग्य व्यवस्थापन न केल्यास ते ओझे बनतील: सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्त्वाचे विधान
- मुंबई: ज्या पद्धतीने पक्ष फोडले गेले ते संविधानाच्या चौकटीत बसत नाही खा. सुप्रिया सुळे यांचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल
- पुणे: बस स्थानकाचा रस्ता अवघ्या सहा महिन्यांत खड्ड्यात; कंत्राटदाराला जाब विचारत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे दंडात्मक व कठोर कारवाईचे आदेश
- मुंबई: उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पीओपीच्या मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास मनाई, ९ जूनचा अंतरिम आदेश कायम
महाराष्ट्र
- नागपूर: तरुण पिढी हा देशाचा डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, योग्य व्यवस्थापन न केल्यास ते ओझे बनतील: सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्त्वाचे विधान
- मुंबई: ज्या पद्धतीने पक्ष फोडले गेले ते संविधानाच्या चौकटीत बसत नाही खा. सुप्रिया सुळे यांचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल
- पुणे: बस स्थानकाचा रस्ता अवघ्या सहा महिन्यांत खड्ड्यात; कंत्राटदाराला जाब विचारत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे दंडात्मक व कठोर कारवाईचे आदेश
- मुंबई: उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पीओपीच्या मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास मनाई, ९ जूनचा अंतरिम आदेश कायम
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर
- ओडिशा: स्वातंत्र्यदिनाच्या तयारीदरम्यान बालासोरमध्ये मोठी दुर्घटना; शॉक लागून शिक्षकाचा जागीच मृत्यू, तीन विद्यार्थी गंभीर जखमी
- हरिद्वार: "मला पुन्हा आंदोलन करायला लावू नका" सरकारी नोकऱ्यांमध्ये ९९% घोटाळा असल्याचा दावा करत बाबा रामदेव यांचा तीव्र इशारा

























Subscribe to my channel




