उत्तर प्रदेश: सुलतानपूर जिल्ह्यातील रामनगर कोट गावातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या एका १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, केस गळण्याच्या समस्येचा सामना करत होती आणि उपचार करूनही तिला काही फायदा होत नव्हता. केस पूर्णपणे गळाल्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली राहायची आणि लोकांमध्ये जाण्यास तिला संकोच वाटायचा. घटनेच्या दिवशी ती घरातून निघाली, पण उशिरापर्यंत परतली नाही. त्यानंतर गावातील एका बागेत तिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.
सुलतानपूर जिल्ह्यातील कोतवाली नगर क्षेत्रातील रामनगर कोट गावात ही घटना घडली आहे. मोनी उर्फ प्रिया निषाद असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया रोजच्याप्रमाणे घरातून बाहेर पडली होती. जेव्हा ती बराच वेळ परतली नाही, तेव्हा घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. शोधाशोध करताना गावातील एका बागेत तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळला.
केस गळण्याच्या समस्येने होती त्रस्त
प्रियाचे वडील उदयराज निषाद यांनी सांगितलं की, त्यांची मुलगी बऱ्याच काळापासून केस गळण्याच्या गंभीर समस्येने त्रस्त होती. केस पूर्णपणे गळाल्यामुळे ती डिप्रेशनमध्ये होती. लोकांसमोर जाण्यास तिला संकोच वाटायचा आणि याच कारणामुळे ती नेहमी टोपी घालून राहायची. कुटुंबाने तिच्यावर वैद्यकीय उपचारही केले, पण काही फायदा झाला नाही.
प्रियाच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का
प्रियाला पाच भावंडं आहेत. तिने गावातील प्राथमिक शाळेत पाचवीपर्यंतचं शिक्षण घेतलं होतं. वडील उदयराज मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हे कुटुंब आधीच आर्थिक आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत प्रियाच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



