पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:श्रावण कसाही साजरा करा,‎पण एका तपातून नक्की जा‎

आपण लवकरच श्रावण पर्वातून जाणार आहोत. हा शिव-उपासनेचा‎अतिशय पवित्र काळ आहे. भगवान शिवाला जगद्गुरू मानले गेले‎आहे. गुरू परमात्म्याच्या वाणीला शब्द देतो. ईश्वरापर्यंत जाणाऱ्या अनेक‎मार्गांपैकी एक प्रमुख मार्ग गुरूचा आहे. श्रावणाचा भगवान शिवाशी‎असलेला सर्वात मोठा योग म्हणजे, याच महिन्यात माता पार्वतीने‎शिवाला प्राप्त करण्यासाठी घोर तपश्चर्या केली होती. मग आपणही‎श्रावण कसाही साजरा करू, पण एका तपातून नक्कीच जायला हवे.‎ आजकाल आपल्या आयुष्यात कंटाळा आणि थकवा खूप लवकर येतो.‎कंटाळ्याचा संबंध मनाशी असतो. आणि थकव्याचा संबंध शरीराशी‎असतो. जेव्हा मन आशा सोडते, तेव्हा कंटाळा येतो. यावर उपाय म्हणजे‎ध्यान करणे. तसेच जेव्हा शरीरात ऊर्जेची कमतरता असते, तेव्हा‎थकवा येतो. तो घालवण्याचा एक मार्ग म्हणजे वेळेवर विश्रांती घेणे.‎श्रावण महिना शृंगार आणि प्रेमाची जिवंत अभिव्यक्ती करतो. मग या‎श्रावण महिन्यात आपण वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा स्वतःमध्ये का निर्माण‎करू नये, जेणेकरून कंटाळा आणि थकवा आपल्याला त्रास देणार‎नाही.

This post was originally published on this site.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *