पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.

पुणे (यवत): पत्नीसोबत तिचा प्रियकर राहत असल्याच्या रागातून पतीने तिच्या डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना बोरीभडक (ता. दौंड) येथे शुक्रवारी (दि. ७) रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. मृत तरुणीचे नाव आचल यादव (वय अंदाजे १८) असे असून, खून केल्याच्या प्रकरणी आरोपी शंकर बकस सिंग (वय २२, रा. खवपुर, जि. अमेठी, उत्तर प्रदेश) याला यवत पोलिसांनी अटक केली आहे.

७ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बोरीभडक गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गाच्या सोलापूरकडे जाणाऱ्या लेनपासून सुमारे १५० मीटर अंतरावरील मोकळ्या जागेत ही घटना घडली. आचल पतीला सोडून रोहन गवळी याच्यासोबत राहत असल्याचा राग आरोपीच्या मनात होता. यामुळे त्याने शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देत आचलच्या डोक्यात दगड मारल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी रोहन मच्छिंद्र गवळी यांच्या फिर्यादीवरून यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सागर माने करीत आहेत.


Disclaimer: या पोस्टमधील माहिती उपलब्ध वृत्तस्रोत व अधिकृत माहितीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे. तपास किंवा अधिकृत प्रक्रियेनुसार तथ्यांमध्ये बदल होऊ शकतो.
या पोस्टचा उद्देश केवळ माहिती देणे असून अंतिम सत्यता संबंधित शासकीय यंत्रणा व न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून आहे.



गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *