जर तुम्ही तुमच्या कामावर खूप प्रेम करत असाल, तर विचार करा जेव्हा कुणी तुम्हाला विचारेल की ‘तुम्ही काय विकत आहात?’ तेव्हा तुमचे उत्तर काय असेल? कदाचित तुम्ही हा प्रश्न विचारणाऱ्याच्या अज्ञानावर हसाल आणि म्हणाल, ‘मी तर नोकरी करतो.’ किंवा चिडून म्हणाल, ‘तुम्हाला कुणी सांगितले की मी काही विकत आहे? तुम्हाला माहीत नाही का की मी एक इंजिनिअर किंवा बिझनेस अॅनालिस्ट आहे?’ सत्य हे आहे की दोन्हीही उत्तरे चुकीची आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रत्येक कर्मचारी प्रत्यक्षात एकच गोष्ट विकत असतो. ती म्हणजे स्वतःची वेळ! उद्योजक तुमची वेळ खरेदी करतात, तुम्हाला त्यांच्या गरजेनुसार कौशल्य शिकवतात. ते तुमच्याकडून असे काम करून घेतात, ज्यामुळे त्यांना उत्पन्न मिळते. आता एका कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हची कल्पना करा. कार्यालयातून घरी परतताना तो उबर, ओलासारखे अॅप सुरू करतो, एका प्रवाशाला सोबत घेतो व स्वतःच्या घराजवळ पोहोचण्यापूर्वी त्याला ड्रॉप करतो. रात्री ९ वाजता एक पिता वा पतीची भूमिका निभावण्यापूर्वी, तो मॅनेजर काही काळासाठी राइड-शेअरिंग ड्रायव्हर बनतो. वेळेच्या या वापराला प्रतिष्ठेतील घसरण मानायचे? की आर्थिक शहाणपण म्हणून दाद दिली पाहिजे? दुर्दैवाने, समाजात आजही पदांना अधिक महत्त्व दिले जाते. आपण मोठ्या पदाचे कौतुक करतो, पण जर तीच व्यक्ती कार्यालयानंतर टॅक्सी चालवून, किराणा सामान डिलिव्हर करून किंवा फ्रीलान्सिंग करून अतिरिक्त कमाई करत असेल, तर आपण तिच्याकडे त्या दृष्टीने पाहत नाही. आपण प्रामाणिकपणे कमावलेल्या प्रत्येक रुपयाला समान सन्मान का देत नाही? घर, शिक्षण, आरोग्य सेवा व रिटायरमेंट प्लॅनिंगच्या खर्चामुळे मध्यमवर्गीयांच्या जीवनाचे अर्थशास्त्र बदलले. उत्पन्नाचा दुसरा मार्ग अपयशाचे प्रतीक नाही तर अनेकांसाठी ही जबाबदारीची जाणीव आहे. हा बदल परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती, जिद्द व कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी सामाजिक पूर्वग्रह बाजूला ठेवण्याचे धाडस दर्शवतो. वेळ हेच धन आहे. जर अतिरिक्त वेळ असेल, तर कसलाही संकोच न बाळगता त्याचा योग्य वापर करा. मॅनेजमेंट टिप: जेव्हा लोकांच्या सामाजिक स्थितीवर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी उत्पन्नाचे मार्ग निर्माण करण्यासाठी त्यांचे कौतुक करू लागतो, तेव्हा अशा समाजाची निर्मिती करू जो खोट्या प्रतिष्ठेऐवजी श्रमाच्या प्रतिष्ठेला सन्मान देईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
महाराष्ट्र
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- कोल्हापूर: निधी मिळत नसल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप; आमदार सतेज पाटील यांचा मोठा दावा!
- जळगाव: महाराष्ट्रात दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार? आमदार बच्चू कडू यांचे मोठे भाकीत, जळगावमधून किशोर पाटलांना मंत्री करण्याची मागणी!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

भिंगारच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा लाठीचार्ज? कार्यकर्त्यांचे गंभीर आरोप!
24 September 2026
24 September 2026
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




