मुंबई: महानगरपालिकेच्या अंधेरी येथील नामांकित आणि मोठ्या कूपर रुग्णालयातून एक अत्यंत संतापजनक आणि चिंतेची बाब समोर आली आहे. रुग्णालयाच्या एक्स-रे विभागातील तिन्ही मुख्य मशिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्या गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे बंद पडल्या आहेत. या गंभीर समस्येमुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य व गरीब रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असून, त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कूपर रुग्णालयात उपनगरा परिसरातील हजारो नागरिक उपचारासाठी व वैद्यकीय तपासणीसाठी दररोज येतात. या रुग्णालयात दररोज सुमारे एक हजार रुग्ण विविध आजार, आपत्कालीन प्रसंग व अपघातांवरील उपचारासाठी दाखल होतात. उपचारादरम्यान डॉक्टरांकडून अनेक रुग्णांना वैद्यकीय चाचणीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, विभागातील तिन्ही प्रमुख एक्स-रे मशिनच बंद असल्यामुळे रुग्णांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे.
मशिन बंद असल्याने रुग्णालय प्रशासनाकडून सध्या पर्यायी व्यवस्था म्हणून पोर्टेबल एक्स-रे मशिनचा वापर करून सेवा दिली जात असल्याचा दावा केला जात आहे. तसेच काही अतिशय गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना उपचारासाठी आणि एक्स-रेसाठी जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात पाठवले जात आहे. मात्र, प्रशासनाच्या या अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक गरीब रुग्णांना नाईलाजाने बाहेरच्या महागड्या खासगी एक्स-रे सेंटरमध्ये पैसे देऊन चाचण्या कराव्या लागत आहेत. यामुळे आधीच आजारपणाने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांवर मोठा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे यांनी स्पष्ट केले की, "सध्या तिन्ही एक्स-रे मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्या बंद आहेत, मात्र रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून पोर्टेबल मशिनच्या साहाय्याने शक्य तितक्या चाचण्या याच ठिकाणी केल्या जात आहेत. कोणत्याही रुग्णाला विनाकारण बाहेर पाठवले जात नाही. सुरुवातीच्या काळात काही रुग्णांना ट्रॉमा रुग्णालयात पाठवण्यात आले होते, आणि नवीन मशिन खरेदी करण्याची अधिकृत प्रक्रिया देखील तातडीने सुरू करण्यात आली आहे." प्रशासनाने लवकरात लवकर नवीन यंत्रसामग्री बसवून रुग्णांची ही हेळसांड थांबवावी, अशी मागणी संतप्त नागरिकांमधून केली जात आहे.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!

























Subscribe to my channel




