मुंबई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना: पहिली यादी जाहीर होणार, ३० जुलैपूर्वी पैसे खात्यात जमा होणार

मुंबई: राज्यातील बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून, बहुप्रतिक्षित अशा 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, ३० जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

काय म्हणाले कृषीमंत्री दत्तात्रय भरणे?
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच पहिली यादी जाहीर केली जाईल. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी ३६ हजार ५८५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकरी पुन्हा एकदा नव्या उमेदीने शेती करू शकतील आणि आर्थिक संकटातून त्यांची सुटका होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या योजनेच्या अंमलबजावणीबाबत शेतकरी संघटनांकडून काही मागण्या आणि प्रश्न उपस्थित केले जात असले, तरी सरकारकडून सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *