कोल्हापूर: सायबर गुन्हेगारीची एक अत्यंत मोठी आणि थरारक घटना समोर आली आहे. कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असल्याचा बनाव रचून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विविध बँक खात्यांवर तब्बल २ कोटी रुपयांहून अधिक रक्कम वळवून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर गुन्हेगार टोळीचा कोल्हापूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून पाच संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
गोकुळ शिरगाव एमआयडीसी परिसरातील 'युनिटी मोटर्स' या वाहन विक्रेता कंपनीच्या व्यवस्थापनाला काही दिवसांपूर्वी एका सायबर फसवणुकीचा फटका बसला होता. कंपनीच्या व्यवस्थापकाला व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून एका व्यक्तीने आपण कंपनीचा ग्रुप सीईओ असल्याचे भासवले. नवीन व्यावसायिक करारांसाठी व तातडीच्या कामासाठी तातडीने पैसे पाठवण्याचे कारण सांगत या भामट्यांनी विविध राज्यांमधील वेगवेगळ्या बँक खात्यांवर तब्बल २ कोटी ३६ लाख रुपयांहून अधिक रक्कम ट्रान्सफर करून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने तत्काळ कोल्हापूर पोलिसांकडे धाव घेतली, ज्यानुसार गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अशी केली पोलिसांनी कारवाई
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत कोल्हापूर पोलीस अधीक्षक आणि सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि आर्थिक व्यवहारांच्या डेटाचा कसून माग काढण्यास सुरुवात केली. आयपी एड्रेस ट्रेसिंग आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांचे पथक गुजरातच्या दिशेने रवाना झाले. स्थानिक गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तब्बल दहा दिवस साध्या वेशात अहमदाबादेत हॉटेल, लॉज आणि विविध भागांत मुक्काम केला.
अखेर सखोल शोधमोहीम राबवत पोलिसांनी या आंतरराज्यीय टोळीचा मुख्य सूत्रधार राजेश ऊर्फ डीके गिर्धारीलाल गुरनानी (५३) याच्यासह भावीन हर्षदभाई खंडेरा (२३), देव परेशभाई त्रिवेदी (२३), जटीन अशोककुमार पाल (२०) आणि अर्पण रामकुमार पांडे (२३, सर्व रा. अहमदाबाद) या पाच जणांना अटक केली. या आरोपींमध्ये ऑटोमोबाइल इंजिनिअर आणि कॉलेजच्या तरुणांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली डिजिटल उपकरणे आणि खात्यांची सखोल चौकशी सुरू असून, या रॅकेटमागील इतर म्होरक्यांचा शोध घेतला जात आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




