Pune Accident : पुण्यात मध्यरात्री भीषण अपघात; ३ जणांचा जागीच मृत्यू, काळे कुटुंबावर दुर्दैवी घाला

Pune : मध्यरा‍त्री झालेल्या भीषण अपघाताने पुण्यातील शिरूर तालुका हादरला आहे. येथील निमोणे येथे मध्यरात्री एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एक चिमुकलीचाही समावेश आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करण्यास सुरूवात केली. पण तोपर्यंत वेळ गेला होता. या अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झालाय. अपघातानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

काळे कुटुंबावर दुखाचा डोंगर -

पुण्यातील शिरूर तालुक्यातील निमोणे येथे मध्यरात्री काळे कुटुंबावर काळाने घाला घातला. कारच्या भीषण अपघातात चिमुकलीसह ३ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर–न्हावरे चौफुला रोडवरील नलगे वस्ती दरम्यान कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू -

पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले आहे. अपघात नेमका का आणि कसा झाला? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. मृतांमध्ये पवन काळे, आराध्या काळे आणि बाळासाहेब नागवडे यांचा भीषण अपघातात मृत्यू झाल. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  भीषण अपघातानंतर काळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *