पिढ्यान्पिढ्या भारतीय पालक आपल्या मुलींना मन लावून शिक्षण घे, मोठी स्वप्ने पाहा आणि आयुष्यात काहीतरी मोठे कर, असे सांगत आले आहेत. मात्र लग्नाचे वय आले की हा संदेश अचानक बदलतो. त्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते की आता तडजोड करायला शिक. ही परिस्थिती मी अनेकदा प्रत्यक्ष पाहिली आहे. डॉक्टर, उद्योजक, कलाकार किंवा शिक्षणतज्ज्ञ होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या अनेक गुणी मुली महाविद्यालयानंतर तर काही वेळा शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच अचानक दिसेनाशा होतात. त्यांचे लग्न होते. त्यानंतर करिअर हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा पर्याय राहत नाही. आर्थिक स्वावलंबनालाही दुय्यम स्थान दिले जाते. त्यांच्या सर्व महत्त्वाकांक्षा जणू एखाद्या डिझायनर लेहंग्यात गुंडाळून ठेवल्या जातात. त्यांची ओळख केवळ तीन शब्दांत मर्यादित राहते – पत्नी, आई आणि सून. येथे एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. हा लेख अरेंज्ड मॅरेजच्या विरोधात नाही. अशा लाखो विवाहांत प्रेम, जिव्हाळा व यश आहे. मात्र येथे आज्ञाधारकपणाला सद्गुण, पालनाला संमती आणि कर्तव्याला इच्छा समजण्याची चूक करतात. अशा अरेंज्ड मॅरेज पद्धतीवर येथे प्रश्न उपस्थित केला जातो. गेल्या काही दशकांत भारतात मोठे बदल झाले आहेत. महिला विद्यापीठांच्या गुणवत्ता यादीत अव्वल येत आहेत. कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत. लढाऊ विमानांच्या तुकड्यांचे नेतृत्व करत आहेत. युनिकॉर्न कंपन्या उभारत आहेत व सर्वोच्च न्यायालयात प्रभावी बाजू मांडत आहेत. आपण त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवतो. पण स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा निर्णय घेण्याइतका विश्वास मात्र आजही ठेवत नाही. आजही प्रश्न तेच आहेत – लोक काय म्हणतील? मुलगा योग्य समाजातील आहे का? मुलगी जुळवून घेऊ शकेल का? पण एखाद्या मुलीला तिची स्वतःची इच्छा काय आहे, हा प्रश्न किती वेळा विचारतो? अलीकडील सिया गोयल प्रकरणच घ्या. सियाने केलेल्या गुन्ह्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही. मात्र या घटनेने अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न समोर आणले. महिलांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या निर्णयांपैकी एका निर्णयावर स्वतःचा अधिकार नसल्याची जाणीव होते. तेव्हा काय घडते? केवळ कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आखून दिलेले आयुष्य जगण्याचे भावनिक परिणाम काय असतात? हे प्रश्न एखादी शोकांतिका घडल्यानंतर विचारण्याची वाट पाहता येणार नाही. विवाह ठरण्यापूर्वीच ते विचारले गेले पाहिजेत. कारण आजची पिढी संमती म्हणजे केवळ लग्नाच्या दिवशी ‘हो’ म्हणणे असे मानत नाही. त्यांच्या दृष्टीने संमती म्हणजे भावनिक दबाव, सामाजिक बहिष्कार किंवा आयुष्यभर अपराधीपणाची भावना न बाळगता ‘नाही’ म्हणण्याचे स्वातंत्र्य. लग्न करायचे की नाही, कधी करायचे आणि कोणाशी करायचे, याचा निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य. आणि हे कोणतेही पाश्चात्त्य विचार नाहीत; ते मानवी मूल्ये आहेत. विसंगती अशी की आपण मुलींच्या शिक्षणावर वर्षानुवर्षे गुंतवणूक करतो. त्यांना स्वतंत्र विचार करायला, मोठ्या स्पर्धांमध्ये उतरायला प्रोत्साहन देतो. पण लग्नाचा विषय आला की त्याच स्वतंत्र विचाराला बंडखोरी मानले जाते. समस्या अरेंज्ड मॅरेजमध्ये नाही. समस्या अशी आहे की विवाहसंस्था वगळता जवळपास प्रत्येक गोष्टीचे आधुनिकीकरण झाले आहे. मात्र विवाह हा आज्ञाधारकपणाचे बक्षीस नसून स्वतंत्र निर्णयाचा परिणाम असला पाहिजे. कुटुंबीयांनी भावी जोडीदारांची ओळख करून देण्यात काहीच गैर नाही. समाजाने परंपरांचा उत्सव साजरा करण्यातही हरकत नाही. संस्कृतीही टिकून राहू शकते. पण एखादी परंपरा व्यक्तीच्या स्वातंत्र्याला बळ देण्याऐवजी त्याचे दमन करू लागली, तर त्यात बदल करणे आवश्यक ठरते. सर्वात मजबूत नाती कौटुंबिक दबाव किंवा सामाजिक जबाबदारीवर उभी नसतात. सर्वात मजबूत नाती दोन व्यक्तींनी एकमेकांची स्वतंत्रपणे केलेली निवड यावर आधारलेली असतात. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) समस्या अरेंज्ड मॅरेजमध्ये नाही. समस्या अशी आहे की विवाहसंस्था वगळता आपण जवळपास प्रत्येक क्षेत्राचे आधुनिकीकरण केले आहे. विवाह हा केवळ आज्ञाधारकपणाचे बक्षीस नसून व्यक्तीच्या स्वतंत्र निर्णयाचा परिणाम असला पाहिजे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: सरकारी आश्रमशाळेत नववीच्या विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; चौकशीला वेग
- पुणे: आषाढी वारीचा अनोखा संदेश! 'उभा वृक्षच पांडुरंग'; निसर्गसंवर्धनाचा भावस्पर्शी उपक्रम
- मुंबई: "आता ती कुठे गेली?" पावसाळ्यातील दुर्दैवी घटनांवरून राज ठाकरेंचा आरजे मलिष्कावर सवाल!
- नांदेड: ६० लाखांची पाकिस्तानी ब्युटी उत्पादने जप्त! FDA ची धडक कारवाई, चौकशीला वेग
महाराष्ट्र
- नाशिक: सरकारी आश्रमशाळेत नववीच्या विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; चौकशीला वेग
- पुणे: आषाढी वारीचा अनोखा संदेश! 'उभा वृक्षच पांडुरंग'; निसर्गसंवर्धनाचा भावस्पर्शी उपक्रम
- मुंबई: "आता ती कुठे गेली?" पावसाळ्यातील दुर्दैवी घटनांवरून राज ठाकरेंचा आरजे मलिष्कावर सवाल!
- नांदेड: ६० लाखांची पाकिस्तानी ब्युटी उत्पादने जप्त! FDA ची धडक कारवाई, चौकशीला वेग
गुन्हा
- पुणे: बारामती पोलीस भरतीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल!
- रक्षकच बनले भक्षक! पोलीस भरतीचे आमिष दाखवून दोन पोलिसांकडून तरुणीवर अत्याचार; बारामतीत खळबळ
- बीड हादरले! उचलीच्या पैशांसाठी ऊसतोड कामगाराचे अपहरण, ४ दिवस अमानुष मारहाण आणि तोंडात लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार
- अमरावती: १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून अत्याचार, बदनामीच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल.
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
देश विदेश
- रस्त्याच्या मधोमध वीजेचे खांब! पैसे वाचवण्यासाठी कंत्राटदाराचा जीवघेणा प्रताप; नगरसेवकानेही झटकले हात, म्हणाला, "माझी टर्म संपलीय"
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
























Subscribe to my channel




