उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यात एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सैनी कोतवाली परिसरातील त्रिलोकपूर येथे महामार्गावर उभ्या असलेल्या पिकअप गाडीचे पंक्चर काढत असताना, एका अज्ञात भरधाव वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा त्रिलोकपूर येथील कांगन हॉटेलसमोर एक पिकअप ट्रक पंक्चर झाला होता. गाडी पंक्चर झाल्यामुळे चालक आणि इतर तरुण मिळून रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून त्याचे पंक्चर दुरुस्त करण्याचे काम करत होते. त्याच वेळी, एका अज्ञात भरधाव वाहनाने पिकअपला पाठीमागून जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसलेल्या चारही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे साबिर, अकबर, अन्वर आणि एहसान अशी आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की, चारही तरुणांचे मृतदेह विदारक अवस्थेत सापडले. सध्या सैनी कोतवाली पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत ज्याने या तरुणांना चिरडले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
शहर
- महाराष्ट्रावर पावसाचे सावट: पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना 'ऑरेंज' आणि 'यलो' अलर्ट
- महाराष्ट्र: 'सरल' पोर्टलचा मोठा फटका; राज्यातील १५ ते २० हजार शिक्षकांवर 'बेरोजगारीची' टांगती तलवार!
- नागपूर: महावितरणच्या बदली प्रक्रियेत 'मॉडिफिकेशन गेम'चा आरोप; परिमंडळात गंभीर अनियमिततेची चर्चा
- बदलापूर हादरले: पुराच्या पाण्यात महिलेची उडी; आत्महत्येचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल, शोधकार्य सुरू
महाराष्ट्र
- महाराष्ट्रावर पावसाचे सावट: पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना 'ऑरेंज' आणि 'यलो' अलर्ट
- महाराष्ट्र: 'सरल' पोर्टलचा मोठा फटका; राज्यातील १५ ते २० हजार शिक्षकांवर 'बेरोजगारीची' टांगती तलवार!
- नागपूर: महावितरणच्या बदली प्रक्रियेत 'मॉडिफिकेशन गेम'चा आरोप; परिमंडळात गंभीर अनियमिततेची चर्चा
- बदलापूर हादरले: पुराच्या पाण्यात महिलेची उडी; आत्महत्येचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल, शोधकार्य सुरू
गुन्हा
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!
- "E20 पेट्रोलमुळे बिघडलेली एक तरी गाडी दाखवा!" नितीन गडकरींचे टीकाकारांना थेट आव्हान.
- राम मंदिरात मोठा घोटाळा; ट्रस्टच्या नावाने छापली बनावट पावती पुस्तके; भाविकांकडून उकळले बक्कळ पैसे!
























Subscribe to my channel




