पुणे: मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बचावकार्य राबवत आतापर्यंत ४,५६८ नागरिकांची सुरक्षित सुटका केली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि महसूल यंत्रणा समन्वयाने काम करत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी याबाबत माहिती देत प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत पूरग्रस्त भागांतील मदत व पुनर्वसन कार्याचा आढावा घेतला. धोकादायक ठिकाणांतील नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविणे, निवारा केंद्रांमध्ये अन्न, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे तसेच वीज, पाणीपुरवठा आणि दळणवळण सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यातील धरणांमधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या भागांमध्ये सतर्कता वाढविण्यात आली आहे. प्रशासनाने नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवले असून पूर, दरड कोसळणे आणि धरणांच्या विसर्गासंदर्भातील इशारे नागरिकांपर्यंत वेळेवर पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त बचाव पथके तैनात करण्याची तयारी करण्यात आली असून नागरिकांनी पूरग्रस्त भाग, नदीपात्र आणि पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शहर
- पुण्याला मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर; एका दिवसात ४ टीएमसी पाण्याची आवक!
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
- "शेअर बाजारात हाहाकार: ट्रम्प यांच्या विधानानंतर सेन्सेक्समध्ये १,६७७ अंकांची घसरण; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी पाण्यात"
- कोल्हापूरकरांनो सतर्क राहा! पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली, पावसाचा जोर कायम
महाराष्ट्र
- पुण्याला मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर; एका दिवसात ४ टीएमसी पाण्याची आवक!
- पावसात रायगड किल्ल्यावर जाताय? अतिवृष्टीमुळे पायरी मार्ग दोन दिवस बंद; महाड प्रांताधिकाऱ्यांचे आदेश
- कोल्हापूरकरांनो सतर्क राहा! पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली, पावसाचा जोर कायम
- मुंबई: नांदेड–मुंबईदरम्यान दोन अतिरिक्त साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या सुरू
गुन्हा
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- पश्चिम बंगाल: बारुईपूर १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा.
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!



























Subscribe to my channel


