पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्ते, पूल आणि अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. वाहतूक विभागाने दुपारी प्रसिद्ध केलेल्या अद्ययावत माहितीनुसार नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिंजवडी, वाकड, भोसरी, तळेगाव, देहू, आळंदी, चिखली, मोशी आणि इतर अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू असून, तर काही मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने परिस्थितीनुसार पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
सततच्या पावसामुळे अनेक अंडरपास आणि सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी वाहने अडकली असून अग्निशमन दल, महापालिका आणि वाहतूक पोलिसांची पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. पाणी उपसण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
आळंदी आणि देहू परिसरातही नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने काही पूल आणि रस्त्यांवर वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शक्य असल्यास घरातून काम (Work From Home) करण्याचा सल्ला काही कंपन्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून वाहन चालवू नये, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि प्रवासापूर्वी वाहतुकीची सद्यस्थिती तपासूनच बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे. हवामान विभागानेही पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याचे सांगितले असून नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
शहर
- पुणे: मुळा-मुठा आणि भीमा नदीला महापूर! संगम-वाळकी पूल पाण्याखाली; दौंड तालुक्यात रेड अलर्ट
- मुंबई: मालाडमध्ये मालमत्तेच्या वादातून मुलाने वृद्ध आईला आणि बहिणीला लाथाबुक्क्यांनी मारले; नराधम अटकेत!
- पुणे: बेल्हे येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या आधुनिक धान्य गोदामाचे उद्घाटन; शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
- अमरावती: जीर्ण वीज खांब कोसळल्याने शेतकरी दाम्पत्य व दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: मुळा-मुठा आणि भीमा नदीला महापूर! संगम-वाळकी पूल पाण्याखाली; दौंड तालुक्यात रेड अलर्ट
- पुणे: बेल्हे येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या आधुनिक धान्य गोदामाचे उद्घाटन; शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
- अमरावती: जीर्ण वीज खांब कोसळल्याने शेतकरी दाम्पत्य व दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू
- नागपूर: महिलेच्या घरात बेकायदा प्रवेश प्रकरणी पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका; नुकसानभरपाई देण्याचे आदेश
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- इराणमध्ये युद्धाच्या छायेत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात! तेहरानमध्ये लाखो जनसमुदाय रस्त्यावर, डोनाल्ड ट्रम्प विरोधात संतापाचा उद्रेक!

























Subscribe to my channel



