पगार झाल्यानंतरचा पहिला शनिवार आहे. कल्पना करा की, आज रात्री तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत डिनरला जात आहात. तुमच्या जोडीदाराने खूप शोध घेतल्यानंतर एक नवीन रेस्टॉरंट निवडले. कारण सर्च इंजिनवरून समजले की नवीन रेस्टॉरंट्समध्ये तेच सर्वात लोकप्रिय आहे. ग्राहकांनी त्याला सर्वाधिक 5 स्टार रेटिंग दिली आहे. पण जेवणानंतर मुसळधार पाऊस सुरू होतो आणि घरी परतण्यासाठी तुम्हाला एकही कॅब मिळत नाही. मोठ्या आव्हानातून तुम्ही उशिरा रात्री घरी पोहोचता आणि थकून झोपता. आता विचार करा, रविवारी तुम्ही पाहुण्यांना काय सांगाल- रेस्टॉरंटचा की रस्त्यावर आलेला अनुभव? तुम्ही दोन्ही गोष्टी सांगितल्या तरी मला खात्री आहे की तुम्ही चांगल्याऐवजी वाईट अनुभवाबद्दल जास्त बोलाल. आता कार किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचे आणखी एक उदाहरण घेऊ. घरबसल्या एखाद्या व्यक्तीला कार किंवा प्रॉपर्टी विकणाऱ्या विविध वेबसाइट्सवर जावे लागते. या साइट्स त्यांच्या किमती सांगतील. व्यक्तीला एका कागदावर त्या किमतींचा तुलनात्मक चार्ट बनवावा लागेल. या साइट्सवर जाणे त्रासदायक नसले तरी हे काम नक्कीच वेळखाऊ आहे. अशी कोणतीही एकच साइट नाही, जिथे सर्व वाहनांच्या किमती एकत्र दाखवल्या जातील. विम्याची किंमत, आरटीओ शुल्क आणि इतर आवश्यक चार्जेसदेखील दिलेले असतील. पण आता तसे राहिलेले नाही. सिंगापूरची डीबीएस बँक हे करते. तिने उत्पादन-केंद्रित रणनीतीच्या पुढे जाऊन अनुभव-आधारित रणनीती अवलंबली आहे. म्हणजेच ती आपले वेगवेगळे वित्तीय उत्पादने विकण्याऐवजी ग्राहकांच्या विविध गरजांनुसार इंटिग्रेटेड ऑफर सादर करते. कार खरेदी करणाऱ्यांना केवळ वाहनाची किंमतच मिळत नाही, तर ते वेगवेगळ्या वाहनांची इन्शुरन्स किंमत, आरटीओ फीची तुलनाही करू शकतात. सोबतच बँकेची फायनान्सिंग सुविधाही मिळते. या सर्व गोष्टींसाठी एकच ‘प्लॅटफॉर्म’ बनवून डीबीएस बँक आता फक्त कर्ज देणारी बँक राहिलेली नाही, तर तिने स्वतःला ग्राहकाच्या एंड-टु-एंड जर्नीचे केंद्र बनवले आहे. याचा अर्थ ग्राहकाच्या प्रवासाला बाहेरून आतल्या बाजूने री-डिझाइन करणे, ज्याची सुरुवात ‘ग्राहकाला काय मिळवायचे आहे?’ या प्रश्नाने होते. डीबीएस बँक आता आपले वित्तीय उत्पादन कसे विकायचे यावर लक्ष केंद्रित करत नाही. प्रॉपर्टी किंवा कारसाठी कर्ज देण्याचे लक्ष्य ठेवण्याऐवजी ती अशी कोणीतरी बनली आहे, जिची इच्छा आहे की तुम्ही कार किंवा घर खरेदी करावे. बँकेने आपल्या फायनान्सिंग ऑफरिंगसोबत प्रॉपर्टी सर्च, कायदेशीर सेवा, विमा आणि सामान शिफ्ट करण्यापर्यंतची माहिती जोडून स्वतःला एखाद्या फायनान्स प्रोव्हायडरऐवजी एक ऑर्केस्ट्रेटर बनवले आहे. यामुळे ती ग्राहकाच्या संपूर्ण निर्णय प्रक्रियेचा डेटा कॅप्चर करते. ग्राहकाशी संबंध अधिक घट्ट होतात आणि ग्राहकासाठी तिची साइट सोडणे कठीण होऊन बसते. बहुतांश सर्व्हिस प्रोव्हायडर साइटवर आपली व्हिजिबिलिटी वाढवण्यासाठी स्पर्धा करतात. जसे की हॉटेल्स पहिल्या 5 किंवा 10 परिणामांमध्ये दिसण्यासाठी किंवा मग रेस्टॉरंटप्रमाणे 5 स्टार रिव्ह्यू मिळवण्यासाठी स्पर्धा करतात. पण त्यांच्यापैकी किती जण याबद्दल विचार करतात की बुकिंग डेटावरून माहिती घेऊन ग्राहकाला पिक-अप सुविधा दिली जावी. वर सांगितलेल्या रेस्टॉरंटकडे जर अतिरिक्त शुल्क घेऊन ड्रॉप-इन सुविधा असती आणि रेस्टॉरंट मॅनेजरने तुम्हाला मुसळधार पावसाची माहिती देऊन चांगल्या परिवहन सुविधेचा भरवसा दिला असता तर तुम्हाला असे वाटत नाही का की रेस्टॉरंटचा अनुभव तुमच्यासाठी फाइव्ह स्टारपेक्षाही उत्तम ठरला असता? फंडा असा आहे की, व्यवसायांनी डिजिटल दुनियेत केवळ आपली उत्पादने प्रमोट करण्याऐवजी त्याच साइटवर ग्राहकांना अनुभव देण्यास सुरुवात केली तर हे ‘प्लॅटफॉर्माइझेशन’ अनेक ग्राहकांना आकर्षित करेल. कारण हे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या फुलांचा बुके ऑफर करण्यासारखे आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- म्हाडाची बंपर लॉटरी! मुंबई परिसरामध्ये ८ हजार घरांची सोडत; ऑक्टोबरमध्ये मिळणार हक्काचं घर!
- एक गूढ कलाकृती: 'विकृत' वाटणाऱ्या त्या चित्राला पाहण्यासाठी आजही का लागतात लांबच लांब रांगा?
- पालकांनो नोंद घ्या! ७ आणि ८ जुलै रोजी राज्यातील शाळा बंद; प्रलंबित अनुदानासाठी शिक्षकांचा एल्गार, आझाद मैदानावर ठिय्या
- मुंबई: मॅनहोल दुर्घटनेत मोठी कारवाई! कंत्राटदार फरार, तीन मजूर पोलिसांच्या ताब्यात
महाराष्ट्र
- लातूर: कौटुंबिक वादातून पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- पालकांनो नोंद घ्या! ७ आणि ८ जुलै रोजी राज्यातील शाळा बंद; प्रलंबित अनुदानासाठी शिक्षकांचा एल्गार, आझाद मैदानावर ठिय्या
- मुंबई: मॅनहोल दुर्घटनेत मोठी कारवाई! कंत्राटदार फरार, तीन मजूर पोलिसांच्या ताब्यात
- चंद्रपुरात कौटुंबिक वादातून सख्खा चुलत भाऊच झाला वैरी; बांबूने जोरदार वार करत भावाची केली निर्घृण हत्या
गुन्हा
- धक्कादायक! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निशा चौहानची पतीकडून निर्घृण हत्या; मुलावरही जीवघेणा हल्ला
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
देश विदेश
- सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ! ४ जुलै रोजी सोन्याने गाठली दीड लाखाची पातळी; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे ताजे दर.
- जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा दबदबा! एआय फॉर गुड ग्लोबल कमिशनमध्ये मुकेश अंबानी, सुनील मित्तल आणि लक्ष्मी मित्तल यांची 'फाउंडिंग मेंबर' म्हणून निवड.
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! व्यभिचार सिद्ध करण्यासाठी पती-पत्नीला कॉल रेकॉर्ड आणि हॉटेलचे डिटेल्स लपवता येणार नाहीत; गोपनीयतेचा दावा फेटाळला
- भूतानने नाकारले भारताचे 'E20 पेट्रोल'; तांत्रिक अडचणी आणि आर्द्रतेच्या भीतीने घेतला निर्णय!


























Subscribe to my channel



