येत्या 4 जुलैला अमेरिका आपला 250 वा वर्धापन दिन साजरा करेल. मात्र, हा उत्सव आनंदाचा व आत्मपरीक्षणाची वेळ ठरला आहे. जग अमेरिका एक यशस्वी देश म्हणून पाहते, पण स्वतः अमेरिकन नागरिक आज नैराश्यात आहेत. गॅलपच्या एका सर्व्हेनुसार, 2000 मध्ये 55% अमेरिकन लोकांना वाटायचे की देशाची प्रगती पाहून अमेरिकेचे संस्थापक आनंदी होतील. आज केवळ 19% लोकांनाच असे वाटते. थोडक्यात, अमेरिकेने आपल्या संस्थापकांची प्रतिष्ठा कमी केली आहे. प्रथमदर्शनी याचे खापर ट्रम्प यांच्या भ्रष्ट प्रशासनावर फोडता येईल. गेल्या दशकांत ट्रम्प यांचा उदय, पतन आणि पुन्हा उदय यामुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पण समस्या यापेक्षा कितीतरी अधिक गुंतागुंतीच्या आहेत आणि त्या अमेरिकन समाजातील विभाजनांत दडल्या आहेत. एका बाजूला ‘मागा’ चळवळ आहे, जी आता ‘ट्रम्प-भक्त’ आणि ‘अमेरिका-फर्स्ट’ समर्थक अशा दोन गटांत विभागली जात आहे. ट्रम्पभक्त डोळे झाकून त्यांचे समर्थन करतात, तर ‘अमेरिका-फर्स्ट’ समर्थक राष्ट्रवादी विचारांचे असून ते ट्रम्प यांच्या अनेक धोरणांशी असहमत आहेत. ‘अमेरिका-फर्स्ट’ आंदोलनातील प्रभावी चेहरे असलेले टकर कार्लसन आणि मार्जोरी टेलर ग्रीन एकेकाळी मागा चळवळीचे खंदे समर्थक होते, पण आता त्यांनी रिपब्लिकन पक्षाची साथ सोडली आहे. ट्रम्प यांची धोरणे आणि इराणविरुद्धचे युद्ध हे स्वतःच्याच चळवळीशी केलेला विश्वासघात असल्याचे ते मानत आहेत. ट्रम्प यांच्या पुनरागमनात मदत करणारे पॉडकास्टर थिओ वॉन, टिम डिलन आणि कॅंडेस ओवेन्स हेदेखील आता ट्रम्पविरोधी झाले आहेत. दुसरीकडे, डेमोक्रॅटिक पक्षही समाजवादी शक्तींच्या दबावाखाली आहे. न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी समर्थित केलेले तीन उमेदवार डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये विजयी झाले, हे याचे ताजे उदाहरण आहे. न्यूयॉर्कमधील काही अपार्टमेंट्सचे भाडे गोठवण्याचा निर्णय तेथील 25% रहिवाशांना दिलासा देणारा आहे. गतवर्षीच्या गॅलप सर्व्हेनुसार डेमोक्रॅट्सना भांडवलशाहीपेक्षा समाजवाद अधिक जवळचा वाटतो. 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांमध्ये हा विचारप्रवाह अधिक प्रबळ आहे. अमेरिकन जनतेचा इस्रायलप्रति घटता पाठिंबा हे अंतर्गत अस्वस्थतेचे आणखी एक लक्षण आहे. शक्तिशाली लॉबींच्या पाठिंब्यामुळे इस्रायलला पूर्वी दोन्ही पक्षांचे भक्कम समर्थन होते. पण आता चित्र बदलले आहे. 60% अमेरिकन इस्रायलकडे नकारात्मक दृष्टीने पाहतात, ज्यात जवळपास 80% डेमोक्रॅट्सचा समावेश आहे. ‘एआय’ हादेखील विभाजनाचा आणखी एक मुद्दा बनला आहे. याच्या नियंत्रणावरून डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्समध्ये कामगार-समर्थक युती तयार होत आहेत. एकीकडे उत्पादकता वाढवण्यासाठी एआय वापरणारा गट आहे, तर दुसरीकडे ऑटोमेशनमुळे नोकऱ्या जाण्याची भीती बाळगणारा मोठा वर्ग आहे. एआय डेटा सेंटर्स आणि पॉवर प्लँट्सच्या विरोधातही असंतोष वाढत आहे. या सर्व विभाजनाचे मूळ कारण अशा अर्थव्यवस्थेत आहे, जिने सामान्य अमेरिकन नागरिकांचा विश्वास गमावला आहे. अनेक दशके अमेरिकेने जगाला आणि स्वतःच्या जनतेला प्रगतीची स्वप्ने दाखवली. आता तीच स्वप्ने वादाच्या भोवऱ्यात अडकली आहेत. मालमत्तेच्या किमतींच्या तुलनेत पगारातील वाढ अत्यंत कमी राहिली आहे. ज्यांच्याकडे मालमत्ता आणि शेअर्स आहेत, ते अधिक श्रीमंत झाले. तर पगारावर अवलंबून असलेला मध्यमवर्ग मागे पडला आहे. अमेरिकन लोकशाहीचा कणा असलेला मध्यमवर्ग आकुंचन पावतोय. एक संपूर्ण पिढी शैक्षणिक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे. लाखो लोकांसाठी आरोग्य सेवा महागडी झाली आहे. मोठ्या शहरांत वाढत्या घरांच्या किमतींमुळे स्वतःचे घर हे आता स्वप्नवत झाले आहे. आज आपण जी प्रक्रिया पाहत आहोत, ती एक अराजक स्थिती आहे, जिला ट्रम्प यांनी जन्म दिला. त्यांनी अशा लोकानुनय करणाऱ्या शक्तींना बळ दिले, ज्या आता डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांच्या मूळ ढाच्याला कमकुवत करत आहेत. 250 वर्षांची अमेरिका आज निर्णायक पतनाकडे झुकलेली नाही, पण ती पूर्णपणे सुस्थितीतही नाही. ती एका अस्थिरतेच्या चक्रातून जात आहे, ज्याकडे संपूर्ण जग चिंतेने पाहत आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) 250 वर्षांची अमेरिका आज निर्णायक पतनाकडे झुकलेली नाही, पण ती पूर्ण सुस्थितीतही नाही. अमेरिकन समाज दुभंगलेला आणि राजकारण संभ्रमात आहे. देश एका अस्थिरतेच्या चक्रातून जात आहे, ज्याने संपूर्ण जग चिंतेत आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: एफडीएचा मोठा दणका, 'आईच्या गावात' आणि 'यल्ला-यल्ला' रेस्टॉरंटचे परवाने रद्द
- मुंबई: कळव्यातील लोकल प्रवाशांची मोठी कोंडी! कारशेडकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे प्रशासनाची भिंत, प्रवाशांमध्ये संतापाची लाट
- पुणे: दिग्दर्शक संजय गुप्ताने सिया गोयलची तुलना रिया चक्रवर्तीशी केली, नेटकऱ्यांनी काढले वाभाडे; संतापले युजर्स!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: एफडीएचा मोठा दणका, 'आईच्या गावात' आणि 'यल्ला-यल्ला' रेस्टॉरंटचे परवाने रद्द
- मुंबई: कळव्यातील लोकल प्रवाशांची मोठी कोंडी! कारशेडकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे प्रशासनाची भिंत, प्रवाशांमध्ये संतापाची लाट
- पुणे: दिग्दर्शक संजय गुप्ताने सिया गोयलची तुलना रिया चक्रवर्तीशी केली, नेटकऱ्यांनी काढले वाभाडे; संतापले युजर्स!
- पुणे: 'दुकान उघडलंस तर ठार मारेन!' दारूसाठी पैसे मागितल्याचा राग; वाईन शॉप कर्मचाऱ्यावर बाटलीने जीवघेणा हल्ला
गुन्हा
- बीड: स्कॉर्पिओ आणि १० लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल.
- ऐरोली महापालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणा! चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती सोनम डोंगरे आणि बाळाचा मृत्यू; नवी मुंबईत खळबळ!
- रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीची तस्करी करताना महाराष्ट्रातील दोन पोलीस छत्तीसगडमध्ये जेरबंद; खवल्या मांजराचे खवलेही जप्त!
- कोठडीतील मृत्यूला जबाबदार कोण? वाशिममधील धक्कादायक प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा!
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
देश विदेश
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- मायलेज न सांगताच मारुतीची 'फ्लेक्स-फ्यूल' वॅगनआर बाजारात; तीन आठवड्यांत केवळ ३ कारची विक्री!
- आता आयुष्मान भारत योजनेची कामे होतील व्हॉट्सॲपवर; केंद्र सरकारचा 'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च!
- बसच चोरीला! तेही थेट बसस्थानकातून.. आरोपीकडून तब्बल २० बसेस चोरल्याची कबुली; पोलीसही चक्रावले!

























Subscribe to my channel


