Tragic End for JEE Aspirant in Nagpur: 17-Year-Old Student Takes Her Own Life Due to Study Stress!

नागपुर: हृदयद्रावक घटना; जेईईच्या अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने १७ वर्षीय वैदेहीची आत्महत्या!

Tragic End for JEE Aspirant in Nagpur: 17-Year-Old Student Takes Her Own Life Due to Study Stress!
नागपुर: अभ्यासाच्या अति दबावामुळे आणि जेईई (JEE) परीक्षेच्या तणावामुळे एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने स्वतःचे आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. ही दुर्दैवी घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजना परिसरात घडली. वैदेही सुनील गुलगे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

काय आहे नेमकी घटना?
वैदेही ही बारावीत शिकत होती आणि जेईई परीक्षेची तयारी करत होती. तिची आई वंदना या शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या अभ्यासाचा प्रचंड ताण वैदेहीवर होता आणि ती गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होती. शुक्रवारी सायंकाळी तिची आई कामासाठी बाहेर गेली होती. आई घरी नसल्याची संधी साधून वैदेहीने आपल्या खोलीत साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

आईला उद्देशून लिहिलेली चिठ्ठी
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त केली आहे. या चिठ्ठीत तिने इंग्रजीत लिहिले आहे की, "आई, आय ॲम सॉरी (आई मला माफ कर), मला अभ्यासाचा ताण सहन होत नाहीये." आपल्या मुलीचा मृतदेह पाहून आईने मोठा हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती वाठोडा पोलिसांना दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

एकीकडे शिक्षणाचे वाढते दडपण आणि दुसरीकडे अशा घटनांमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *