मंगळवारी मी मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पवई शाखेत उभा होतो. ऑपरेशन्स मॅनेजरसमोरील रांगेत दुसऱ्या क्रमांकावर उभे असताना मला एक लॉजिस्टिक अपयश पाहायला मिळाले. माझ्या पुढे उभी असलेली व्यक्ती तीस मिनिटे वाट पाहून थकली होती. तो एका विचित्र अडचणीत होता. पाच दिवसांपूर्वी त्याने शाखेच्या ऑटोमेटेड मशीनमध्ये चेक जमा केला होता. पुरावा म्हणून त्याच्याकडे फोटोग्राफिक पावतीही होती. तरीही, बँक ते फिजिकल डॉक्युमेंट (कागदपत्र) शोधू शकत नव्हती. मशीनने ते गिळले की काय? कुणालाच माहीत नाही. माझा स्वतःचा संयमही सुटू लागला होता, तेवढ्यात शाखा व्यवस्थापकाने येऊन मला मदत केली. प्रशासकीय बेजबाबदारपणामध्ये अडकलेली ती अस्वस्थ व्यक्ती तिथेच राहिली आणि मी बाहेर आलो. माझे पुढचे ठिकाण एक प्रमुख रुग्णालय होते, जिथून मला पंधरा दिवसांपासून भरती असलेल्या एका नातेवाइकाला डिस्चार्ज द्यायचा होता. गर्दीच्या या ठिकाणी एका बेडसाठीही अनेकदा मोठी शिफारस लावावी लागते. येथेही मला एक धक्कादायक पॅटर्न दिसला. असा एकही रुग्ण नव्हता ज्याच्याकडे कागदपत्रे नव्हती. सर्वांच्या हातात एकाच रंगाचे फोल्डर्स होते, ज्यात हाताने लिहिलेल्या अपॉइंटमेंट्स आणि प्रिंट केलेले लॅब रिझल्ट्स भरले होते. कारण ‘प्रोव्हायडर्स’ अनेकदा डिजिटल फाइल्सचा मागोवा गमावतात, ज्यामुळे अनावश्यक वारंवार चाचण्या केल्या जातात. हे असेच आहे जणू काही ते त्या चाणाक्ष चिकुनगुनिया व्हायरसला शोधत आहेत, जो सुरुवातीच्या चाचणीत पकडला जात नाही. एआयच्या युगात जगूनही आपली आरोग्य सेवा व्यवस्था १९ व्या शतकातच अडकली आहे. हे एक विचित्र डिजिटल-अॅनालॉग हायब्रिड मॉडेल आहे, जिथे कॉरिडॉरमध्ये आजही फॅक्स मशीन चालतात आणि डॉक्टर व्हॉट्सॲपवर संवेदनशील वैद्यकीय डेटा शेअर करतात. रुग्णालयाच्या प्रत्येक मजल्यावर शेकडो संगणक आहेत. प्रत्येकात माहितीचा महासागर आहे. सर्वत्र डेटा आहे, तरीही डॉक्टर आणि रुग्ण कागदालाच चिकटून आहेत. मला खलाशांची एक जुनी ओळ आठवते- ‘Water, water everywhere, not any drop to drink’. या आधुनिक युगात आपणही रॉ डेटामध्ये बुडालो आहोत, परंतु वापरण्यायोग्य, व्यवस्थित माहितीसाठी तहानलेलेच आहोत. मुळात ही समस्या तंत्रज्ञानाची नसून संस्कृतीची हार आहे. व्यवस्थेचे हे अपंगत्व केवळ मुंबई किंवा भारतापुरते मर्यादित नाही, तर विकसित देशही याच्याशी झुंजत आहेत. सुरुवातीचा तांत्रिक अडथळा आहे, इंटरऑपरेबिलिटी. म्हणजेच वेगवेगळ्या सिस्टिम्सची एकमेकांशी संवाद साधण्याची क्षमता. यावर काही उपाय आहे का? नक्कीच आहे, जर खरोखरच उपाय शोधण्याची इच्छा असेल तर. मोठ्या डेटा सेटचा शोध घेऊन विश्लेषण करण्याच्या क्षमतेवर आधारित एआय जसे मुख्य प्रवाहात येत आहे, तसे आपण अश्मयुगासारख्या काळात अडकून राहू शकत नाही. डेटासाठी स्पष्ट आणि युनिव्हर्सल स्टँडर्ड्स (सार्वत्रिक मानके) तयार करणे आवश्यक आहे आणि हे केवळ बँक किंवा क्लिनिकमधील ग्राहक अनुभव सुधारण्यासाठीच नाही, तर संशोधन, नावीन्य आणि विविध उद्योगांमध्ये एआय च्या विस्तारासाठी मूलभूत अट आहे. केवळ खर्च कमी करण्यापलीकडे, हा वापरकर्त्यांची सुरक्षितता आणि राष्ट्रीय डेटा सार्वभौमत्वाचा मुद्दा आहे. आपल्यासारख्या मोठ्या देशात आरोग्य डेटा हा एक मौल्यवान सामग्री आहे, जी सांभाळावी लागेल आणि प्रभावीपणे वापरावी लागेल. सध्या, बहुतेक आरोग्य सेवा कर्मचारी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ठेवतात, परंतु त्याचा एक छोटासा भागच रुग्णाला दिला जातो. पंधरा दिवसांनंतर रुग्णालयातून जाणाऱ्या व्यक्तीकडे उपचारांचा पूर्ण इतिहास नसतो, तर फक्त ‘डिस्चार्ज समरी’ असते. परिणामी, नवीन रुग्णालय किंवा शहरात नवीन डॉक्टरला पुन्हा नवीन चाचण्या कराव्या लागतात. केवळ खर्चच नाही, तर त्या रुग्णाचे दुःखही समजून घ्या, ज्याला पुन्हा अंगावर सुया टोचून घ्याव्या लागतील. फंडा असा की - डेटा ही प्रत्येक आधुनिक व्यवसायाची ‘क्रीम’ आहे. तथापि, समाज म्हणून आपण ती क्रीम घुसळून लोणी आणि आरोग्यदायी, चविष्ट तूप बनवण्यात अपयशी ठरलो आहोत. जे ग्राहक आणि व्यवसाय दोघांसाठीही फायदेशीर आहे. पुढे जाण्यासाठी आपल्याला हे अंतर भरून काढावे लागेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

पनवेल तालुक्यातील नांदगाव येथील धक्कादायक घटना समोर आली आहे. #punenews #latestnews #viralvideo
पुणे: खून प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद; भारती विद्यापीठ पोलिसांची आंबेगाव पठारात मोठी कारवाई
पुणे: पाणीटंचाईचे संकट! आमदार बापूसाहेब पठारे यांनी विधानसभेत महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




