परभणी: जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील मोहळा गावातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. गोदावरी नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी आणि त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या काकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १४ जून रोजी घडली असून, या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरी करणारी तरुणी आपल्या वीकेंडच्या सुट्टीसाठी गावी आली होती. ती आपली बहीण समीक्षा (१७) आणि काकी सिंधू दत्ता जाधव (४५) यांच्यासह मोहळा येथील गोदावरी नदीपात्रात कपडे धुण्यासाठी आणि अंघोळीसाठी गेल्या होत्या. दरम्यान, तरुणीच्या हातातील शाम्पूच्या १० पुड्या अचानक पाण्यात निसटून वाहून जाऊ लागल्या. त्या पुड्या पकडण्यासाठी तिने एक प्लास्टिकचा रिकामा डबा हातात घेतला आणि ती नदीच्या खोल पाण्यात उतरली. मात्र, डब्याचे झाकण उघडल्याने त्यात वेगाने पाणी शिरले आणि तिचे संतुलन बिघडले. तिला पाण्यात बुडताना पाहून तिची बहीण समीक्षा तिला वाचवण्यासाठी पुढे धावली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तीदेखील बुडू लागली. या दोघींना वाचवण्यासाठी त्यांच्या काकी सिंधू जाधव यांनीही कसलाही विचार न करता पाण्यात उडी घेतली. दुर्दैवाने, तिघींनाही पोहता येत नसल्यामुळे आणि नदीची खोली जास्त असल्यामुळे त्या तिघीही पाण्याच्या प्रवाहात बुडाल्या.
गावकरी मदतीसाठी धावले, पण...
काही वेळाने ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ नदीकाठाकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी शोधमोहीम राबवून तिन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले, परंतु तोपर्यंत तिघींचाही मृत्यू झाला होता. या घटनेत मृत्यू पावलेल्यांची नावे उत्कर्षा उत्तम जाधव, समीक्षा उत्तम जाधव आणि सिंधू दत्ता जाधव अशी आहेत. या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मोहळा गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




