पुणे: नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने आठवीच्या इतिहास विषयातील पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा गौरवशाली विस्तारक्षेत्र दर्शवणारा नकाशा हटविल्याच्या चुकीच्या व अन्यायकारक निर्णयाविरोधात आता महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसं जातीभेद, धर्मभेद राजकीय मतभेद , गटतट विसरून मराठी बाण्यासाठी एकवटले असून शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील श्रीमंत भोसले घराणे, श्रीमंत राजे शिर्के घराणे, सुभेदार मालुसरे घराणे आदी राजघराणे व सरदार वंशज घराण्यांसह अन्य मराठे शूरवीर सरदार घराणे, वीर मावळ्यांच्या घराण्याचे प्रमुख वंशज प्रतिनिधी, गडदुर्ग संवर्धक, इतिहास प्रेमी व शिव- शंभुभक्तांनी नुकतीच पुणे येथे दि. ५ मे २०२६ रोजी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे प्रमुख वंशज मान्यवरांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीईआरटीने तात्काळ चुक दुरुस्त करावी अन्यथा मराठे मुंबई, दिल्ली पर्यंत आंदोलना माध्यमातून धडकतील असा कडक इशारा राज्य व केंद्र सरकारला दिला आहे.
नागपूरचे राजे रघुजीराजे भोसले यांचे वंशज श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली एनसीईआरटी (NCERT) ने पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटविल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात कायदेशीर आव्हान देण्यात आले असून, सदर जनहित याचिका (PIL) इतिहासप्रेमी व वंशजांनी दाखल केली आहे. पत्रकार परिषदेत शंभुपत्नी महाराणी येसुबाईंचे वडील स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत पिलाजीराव राजे शिर्के यांचे वंशज शंभुसेना प्रमुख श्रीमंत दिपकराजे शिर्के, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरेंचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे आदींसह अन्य वंशज घराणी, गडदुर्ग संवर्धक , इतिहासप्रेमी, शिव-शंभुसैनिक व शिव- शंभुभक्त उपस्थित होते. यावेळी बोलताना वंशजांनी आक्रमक पवित्रा घेत केलेल्या चुकीबद्दल रोष व्यक्त केला.
याचिकाकर्ते राजे मुधोजी महाराज भोसले ( नागपूर ) , शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के ( पुणे ), शिवाजीराजे जाधव ( सिंदखेडराजा ) , ऋषिकेश निकम पाटील (छत्रपती संभाजीनगर) , रघुजीराजे आंग्रे (अलीबाग ) , रविंद्र पडवळ ( पुणे ) , कुणाल मालुसरे ( पुणे ) , राम नारायण मराठा पानीपत ( हरीयाणा ) , शरद मोडे ( बीड ) , अर्थव मारणे ( पुणे ) आदी असून याचिकेत मुख्य मुद्दे मांडत इतिहास विद्रुपीकरण कसे केले, याचिकेत सविस्तर नमूद करण्यात आले आहे की, मराठा साम्राज्याने अठराव्या शतकात भारताच्या मोठ्या भूभागावर अधिपत्य गाजवले होते. मात्र, एनसीईआरटीने ( NCERT ) नवीन बदलांमध्ये हा ऐतिहासिक नकाशा वगळून नवीन पिढीला खऱ्या इतिहासापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
एनसीईआरटीने थेट मराठा अस्मितेवरच घाला घातल्याने, मराठा साम्राज्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते अटकेपार पसरलेले राष्ट्रव्यापी मराठा साम्राज्य होते. असा नकाशा हटवणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शौर्य परंपरेचा , कार्य कर्तृत्वाचा, पराक्रमी वारशाचा , महाराष्ट्रातील व भारतातील आठरापगड जातीचा अपमान असल्याची भावना याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करून NCERT ला सुधारित पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्याचे आदेश द्यावेत, अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे.
आपल्या पूर्वजांनी रक्ताचे पाणी करून हे रयतेचे स्वराज्य आणि मराठा साम्राज्य उभे केले. जगाला हेवा वाटेल असा आपला इतिहास आहे. पुस्तक, ग्रंथ, चित्रपट, सिरियल, मालिका, महानाट्य, नाटकाच्या माध्यमातून जर कोण इतिहास पुसण्याचा, चुकीचा दाखविण्याचा , तो कमी लेखण्याचा प्रयत्न करत असेल, तर महाराष्ट्रासह भारत देशातील, जगातील मराठा समाज व आम्ही वंशज मावळे गप्प बसणार नाही. भावी पिढीला शुद्ध आणि सत्य इतिहास मिळावा, यासाठीच आम्ही हा न्यायालयीन लढा पुकारला असल्याचे मत पत्रकार परिषदे दरम्यान श्रीमंत राजे मुधोजी भोसले, श्रीमंत दिपकराजे शिर्के, कुणाल मालुसरे व अन्य वंशजांनी व इतिहास प्रेमींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सदर याचिकेवर लवकरच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. या लढ्याला शिव-शंभू प्रेमी आणि इतिहासकारांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. अनेक विविध मुद्याच्या आधारवर २६६ पानांची जनहित याचिका (PIL) मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुणे येथील पत्रकार भवनात पत्रकार परिषदे प्रसंगी नागपूरचे महाराज राजे मुधोजी महाराज भोंसले, माजी सैनिक अधिकारी दिपकराजे शिर्के साहेब, सुभेदार कुणाल मालुसरे, रविंद्र पडवळ , ऋषिकेश निकम पाटील, चंद्रकांत ढेंबरे व इतर शिवप्रेमी, इतिहास प्रेमी संघटना, समर्थक मान्यवर उपस्थित होते.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




