"Skills Over Degrees: Recruitment Trends Shift Amid Market Uncertainty!"

नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!

"Skills Over Degrees: Recruitment Trends Shift Amid Market Uncertainty!"नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील कंपन्या नोकरभरती बाबत सावध झाल्या असून, जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीत नवीन भरतीचा वेग कमी राहण्याची शक्यता आहे. अनेक कंपन्या नवीन कर्मचारी घेण्याबाबत विचारपूर्वक निर्णय घेत असल्याचे एका ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

मॅनपॉवरग्रुपच्या रोजगार परिदृश्य सर्वेक्षणानुसार, जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी निव्वळ रोजगार परिदृश्य ४८ टक्के राहिले आहे.

पदवीपेक्षा कौशल्य असणाऱ्यांना अधिक महत्त्व - कंपन्या आता केवळ कर्मचारी भरतीवर भर देत नाहीत. संवाद कौशल्य (Communication Skills), संघभावना (Teamwork), समस्या सोडविण्याची क्षमता (Problem Solving) आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची तयारी (Adaptability) याला अधिक महत्त्व दिले जात आहे. भविष्यातील रोजगार बाजारात ही कौशल्ये निर्णायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

एआयचा प्रभाव वाढतोय; पण पूर्ण अवलंबित्व नाही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा (AI) वापर वेगाने वाढत असला तरी कंपन्या अद्याप पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्यास तयार नाहीत. उलट नेतृत्वगुण (Leadership Qualities) असलेले कर्मचारीच कंपन्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

या क्षेत्रांमध्ये वाढताहेत रोजगाराच्या संधी उपयुक्तता आणि नैसर्गिक संसाधने (Utility & Natural Resources), वित्त व विमा (Finance & Insurance), बांधकाम (Construction), स्थावर मालमत्ता (Real Estate) आणि व्यावसायिक सेवा (Professional Services) या क्षेत्रांमध्ये भरतीची मागणी तुलनेने मजबूत राहण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *