मुंबई: साकीनाका पोलिसांनी एका आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सुरू असलेला मेफेड्रॉन (MD) ड्रग्ज बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ७४ कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज, रसायने आणि यंत्रसामग्री जप्त केली आहे.
नेमकं काय घडलं?
साकीनाका पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने २१ मे रोजी अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर मुस्कान समीर खान (२६) या महिला कॅब चालकाला १०१ ग्रॅम एमडी ड्रग्जसह अटक केली होती. तिच्या चौकशीतून हे ड्रग्ज मुंब्रा येथील वझुल कमर अब्दुल वफा चौधरी (५६) याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी वझुल चौधरीला शिळफाटा येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, चौधरीने गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील वरखड गावात (ता. नांदोद) एका व्यक्तीचे घर भाड्याने घेऊन तिथे एमडी ड्रग्ज निर्मितीचे युनिट सुरू केल्याची धक्कादायक माहिती दिली.
पोलिसांची मोठी कारवाई
मिळालेल्या माहितीच्या आधारे साकीनाका पोलिसांच्या पथकाने गुजरातमध्ये धाड टाकली. तेथे भाड्याच्या घरात सुरू असलेला एमडी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या छाप्यात पोलिसांनी २० किलो लिक्विड मेफेड्रॉन, एमडी बनवण्यासाठी लागणारी विविध रसायने (ब्रोमो-४-मिथिलॅनिलिन, ४-मिथिलप्रोपियोफेनोन इ.), तीन स्टिरर मशिन्स, दोन कमर्शियल फ्रीझर्स आणि अन्य साहित्य असा सुमारे ७४.४६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
मुख्य आरोपी वझुल चौधरी हा सराईत गुन्हेगार असून, तो २००१ पासून अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यात सक्रिय आहे. यापूर्वी त्याला २००१ मध्ये चरस तस्करी प्रकरणात आणि २०१७ मध्ये २३८ किलो एमडी प्रकरणात अटक झाली होती. २०२३ मध्ये तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा एकदा ड्रग्ज निर्मिती आणि वितरणाचे जाळे विणले होते. मुस्कान खान ही देखील या रॅकेटमध्ये सक्रिय असून, ती कॅब चालवण्याच्या बहाण्याने ड्रग्जची विक्री करत होती. सध्या पोलीस या रॅकेटमधील इतर साथीदारांचा आणि त्यांच्या वितरण साखळीचा सखोल तपास करत आहेत.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




