जेव्हा इतर कंपन्या आपले बजेट गोठवत असतात आणि एखादी कंपनी वेगाने नोकरभरती करू लागते, तेव्हा साहजिकच तुमचे लक्ष त्याकडे वेधले जाते. म्हणूनच, जेव्हा मी ऐकले की थायलंडमध्ये मुख्यालय असलेले ॲग्री-टेक स्टार्टअप ‘लिव्हिंग रूट्स’, जे अभी अग्रवाल आणि अविका नरुला यांनी सुरू केले आहे, ते अतिरिक्त लोकांची भरती करत आहे, तेव्हा मला आश्चर्य वाटले की असे का? कुतूहलापोटी केलेल्या शोधात जगभरातील अशा कंपन्यांचा शोध लागला, ज्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ओळखल्या आहेत आणि त्यावर उपाय तयार करत आहेत. लिव्हिंग रूट्स त्यापैकीच एक आहे. ही कंपनी स्थानिक कचरा, सहजीवी मायक्रोब्स आणि एआयआधारित डेटाच्या माध्यमातून रासायनिक खतांना सेंद्रिय पर्याय तयार करते, जेणेकरून मातीचे आरोग्य सुधारेल आणि पारंपरिक रसायनांवरील अवलंबित्व कमी होईल. जगात ग्राहक वस्तूंच्या पुरवठ्याची जीवनरेखा असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीला बाधित करणारे भू-राजकीय तणाव निवळताना दिसत नाहीत. अशा स्थितीत खतांची समस्या दीर्घकाळ टिकू शकते. संघर्ष लांबला तर जगात पिकांचे उत्पादन घटू शकते आणि किराणा महाग होऊ शकतो. अतिरिक्त 4.5 कोटी लोकांना गंभीर अन्न असुरक्षिततेला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा यूएनच्या अन्न आणि कृषी संघटनेने दिला आहे. शेतकरी अनेक महिने, किंबहुना वर्षभरापूर्वीच नियोजन करत असल्यामुळे, अनेक शेतकरी आता 2027 च्या उत्पादनाचा अंदाज लावू लागले आहेत. दुसरीकडे, जागतिक बँकेचा अंदाज आहे की या वर्षी खतांच्या किमती एक तृतीयांशने वाढू शकतात. याची खरेदी क्षमता 2022 मध्ये सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धानंतरच्या सर्वात वाईट पातळीवर पोहोचू शकते. परिणामी, शेतकरी प्रचंड दबावाखाली आहेत. विशेषतः यामुळे, कारण मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या नायट्रोजन खत युरियाचा मोठा हिस्सा आखाती देशांतूनच येतो. कृषी व्यवसाय याचा फटका सहन करत आहेत. काही लोक शेणखतासारख्या जुन्या पद्धतींकडे परतत आहेत, तर काही रसायनांवरील अवलंबित्व कमी करणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. यामध्ये बदामाच्या टरफलांपासून बनवलेल्या इनपुटपासून ते प्रगत मायक्रोबियल उत्पादनांचा समावेश आहे. असेच काम करणारी कॅलिफोर्नियाची ‘नायट्रिसिटी’ आपली क्षमता वाढवत आहे आणि तिचे अंदाजित उत्पादन 2028 पर्यंत बुक झाले आहे. मलेशियातील दुग्ध उत्पादक ‘फार्म फ्रेश’ गुरांचा कचरा कृमींना खाऊ घालते. बदल्यात ते कृमी ते गवत सुपीक बनवतात, जे त्यांच्या गाई खातात. ही कंपनी पूर्वीही असे करत असली, तरी या वर्षी युरियाच्या किमती वाढल्याने ती यावर अधिक अवलंबून राहिली. कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिकाऱ्यांनी सार्वजनिकपणे सांगितले की, ते त्यांच्या जमिनीवर कोंबड्यांची विष्ठा टाकतात. खरे तर, परदेशात पीक वाढीचे मार्ग शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पोल्ट्री खत हे सर्वाधिक मागणी असलेले उत्पादन बनले आहे. लिव्हिंग रूट्सचा दावा आहे की त्यांचे ‘फोटोबूस्ट’ नावाचे उत्पादन रासायनिक खतांचा वापर 50 टक्क्यांपर्यंत आणि खर्च 20 टक्क्यांपर्यंत कमी करू शकते. मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची विष्ठा वाहून नेणारे ट्रान्सपोर्टरही चांगली कमाई करत आहेत. शिवाय, फ्रान्सचे स्टार्टअप ‘टूपी ऑरगॅनिक्स’ आहे, जे शाळांमधून मानवी मूत्र गोळा करून त्याचे अशा बॅक्टेरियल फीडमध्ये रूपांतर करते, जे वनस्पतींच्या वाढीस उपयुक्त ठरते. वाचायला जरी हे विचित्र वाटत असले, तरी सध्या खऱ्या जगात हेच उपाय अमलात येत आहेत. जेव्हा जागतिक कृषी समुदाय या टंचाईवर मात करण्यासाठी व्यावहारिक पर्यायांच्या प्रतीक्षेत आहे, तेव्हा बाजारात एक पोकळीही निर्माण झाली आहे. व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या सुशिक्षित उद्योजकांसाठी हीच संधी आहे की त्यांनी शेतीच्या या समस्यांवर उपाय शोधून परिस्थिती आपल्या बाजूने वळवावी. पण हे तितके सोपे नाही. या उपायांची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करणे हे अजूनही मोठे आव्हान आहे, कारण अनेक दशकांपासून पारंपरिक खतांवर अवलंबून असलेले शेतकरी अनोळखी उत्पादनांवर विश्वास ठेवण्यास सहसा तयार नसतात. काही जैविक उपाय स्थिरतेच्या समस्येशीही झुंजत आहेत. उदाहरणार्थ, मुसळधार पावसात मायक्रोब्स वाहून जातात. पण यामुळे पर्याय तयार करण्याच्या प्रयत्नांमध्ये खंड पडता कामा नये. फंडा हा आहे की, जर तुम्ही भविष्यातील समस्या आधीच ओळखली आणि वेळेवर उपाय तयार केला, तर नफा आपोआप तुमच्या मागे येईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



