छत्रपती संभाजीनगर / परभणी: संपूर्ण महाराष्ट्र सध्या डिझेल आणि पेट्रोलच्या तीव्र टंचाईचा (Fuel Crisis) सामना करत आहे. विशेषतः मराठवाड्यात ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. एकीकडे सामान्य शेतकरी आणि नागरिक पंपांवर तासनतास रांगा लावून उभे आहेत, तर दुसरीकडे मात्र बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या वाळू माफियांच्या गाड्यांना इंधनाचा कोणताही तुटवडा भासत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
परभणीत डिझेलसाठी तुंबळ हाणामारी आणि रांगा
परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डिझेलचा साठा संपत आल्याने अनेक पेट्रोल पंप बंद पडले आहेत. ज्या मोजक्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे, तिथे वाहनांच्या किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. मान्सूनपूर्व शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला डिझेल आवश्यक असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. अशाच एका पंपावर डिझेल भरण्याच्या आणि रांगेत पुढे जाण्याच्या किरकोळ कारणावरून वाहनधारकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठा वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे थेट लाथाबुक्क्यांनी आणि रिकाम्या कॅनने मारामारी करण्यात झाले. या हाणामारीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नागरिकांमधील संयम सुटत चालल्याचे हे स्पष्ट लक्षण आहे.
वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या मात्र 'फुल्ल'
एकीकडे अन्नदाता शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसाठी अवघ्या काही लीटर डिझेल मिळावे म्हणून रात्र-रात्र पंपांवर मुक्कामी थांबला आहे, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एक वेगळेच आणि संतापजनक चित्र पाहायला मिळत आहे. वैजापूर परिसरातील गोदावरी नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या माफियांच्या शेकडो हायवा आणि ट्रकला डिझेलचा कोणताही तुटवडा जाणवत नाहीये. वाळू माफियांच्या गाड्या कोणत्याही रांगेत न उभे राहता रात्रीच्या अंधारात फुल्ल डिझेल भरून धावत आहेत.
प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना ड्रम किंवा बाटल्यांमध्ये डिझेल देण्यास प्रशासनाने कायद्याचा धाक दाखवत बंदी घातली आहे. मात्र, वाळू माफियांच्या बेकायदेशीर गाड्यांना आणि डंपरला खुलेआम हजारो लीटर डिझेल कसे उपलब्ध होत आहे? पेट्रोल पंप चालकांवर माफियांचा दबाव आहे की प्रशासनाचे या काळ्याबाजाराला मूक समर्थन आहे? असा संतप्त सवाल आता मराठवाड्यातील शेतकरी विचारत आहेत. या इंधन टंचाईमुळे ग्रामीण भागात ट्रॅक्टर बंद पडल्याने शेतकऱ्यांना पुन्हा जुन्या पद्धतीने बैलांच्या साहाय्याने नांगरणी करावी लागत आहे, ज्यामुळे वेळेचा आणि पैशांचा मोठा अपव्यय होत आहे.
शहर
- रक्षकच बनले भक्षक! पोलीस भरतीचे आमिष दाखवून दोन पोलिसांकडून तरुणीवर अत्याचार; बारामतीत खळबळ
- पुणे: सोलापूर महामार्गावर दारूने भरलेले पिकअप पलटले; बाटल्या लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड
- गोकुळ' दूध संघ निवडणूक: दुबार ठरावधारकांचा पेच; सुनावणीसाठी अध्यक्ष, सचिव आणि संचालकांना उपस्थित राहणे बंधनकारक
- नाशिकच्या धरणांना नवसंजीवनी! तीन दिवसांच्या मुसळधारेने गंगापूर ६८ टक्क्यांवर, तर दारणा धरण निम्मे भरले
महाराष्ट्र
- पुणे: सोलापूर महामार्गावर दारूने भरलेले पिकअप पलटले; बाटल्या लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड
- गोकुळ' दूध संघ निवडणूक: दुबार ठरावधारकांचा पेच; सुनावणीसाठी अध्यक्ष, सचिव आणि संचालकांना उपस्थित राहणे बंधनकारक
- नाशिकच्या धरणांना नवसंजीवनी! तीन दिवसांच्या मुसळधारेने गंगापूर ६८ टक्क्यांवर, तर दारणा धरण निम्मे भरले
- पालीत खड्डे बुजवण्यासाठी नगरपंचायतीची 'अनोखी शक्कल'; मातीयुक्त खडीमुळे रस्ते बनले 'चिखलदणी', अपघातांचा धोका वाढला
गुन्हा
- बीड हादरले! उचलीच्या पैशांसाठी ऊसतोड कामगाराचे अपहरण, ४ दिवस अमानुष मारहाण आणि तोंडात लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार
- अमरावती: १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून अत्याचार, बदनामीच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल.
- बीडच्या शेतकऱ्याची किमया! पडीक जमिनीवर बहरली 'कोकण बहाडोली' जांभळाची यशस्वी बाग
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"

























Subscribe to my channel




