
Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेत बचावकार्य सुरू असून रेस्क्यू टीमला ९ दिवसांत पहिली खूशखबर मिळालीय. ६ इंची पाईप ४१ मजुरांना जीवनाचा आधार आणि खाद्यपदार्थ पुरवण्यात येणार आहे. हा पाईप टाकला जात होता तेव्हा, हा पाईप दगडातून जाऊ न शकल्यानं अडकला होता. आता या पाईपने ५७ मीटरचा टप्पा ओलांडलाय. आता या पाईपच्या मदतीने सामान्य अन्न म्हणजे ब्रेड, भाजीपाला आणि वैद्यकीय वस्तू कामगारांना उपलब्ध केले जाणार आहेत.
याआधी बोगद्यात अडकलेले मजूर फक्त मुरमुरे, उकडलेले व भाजलेले हरभरे आणि सुका मेवा खात होते. दरम्यान आज उत्तरकाशी बोगदा बचाव NHIDCLनं आज आनंदाची बातमी दिलीय. त्यांच्या अथक परिश्रम करून आज चांगली बातमी दिली. NHIDCL संचालक अंशू मनीष यांनी त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. बचाव मोहिमेबद्दल त्यांनी सांगितले की, डीआरडीओने २० किलो आणि ५० किलो वजनाचे दोन रोबोट पाठवलेत.
|
|
हे यंत्रमानव जमिनीवर चालतात आणि येथे जमिनीची माती वाळूसारखी सरकत आहे. यामुळे हे रोबोट्स तिथे चालू शकतील की नाही याबद्दल शंका आहे. दरम्यान या रोबोटची बचाव मोहिनेत मदत होईल का नाही याची खात्री नसल्याचंही ते म्हणाले.
बोगद्यात अडकलेल्या मजुरांना अन्न आणि औषधं पुरवली जात आहेत. बचाव टीम मजुरांशी नियमित संपर्क करत आहेत. मजुरांचा उत्साह कमी होऊ नये, तसेच त्यांनी संघर्ष करण्याची जिद्द सोडून नये, यासाठी त्यांना प्रोत्साहित करत आहेत. अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी थायलंड आणि नॉर्वे येथील विशेष बचाव पथकांना बोलवण्यात आली आहेत. या दोन्ही बचाव पथकाने २०१८ मध्ये थायलंडमधील गुहेत अडकलेल्या मुलांची यशस्वीरित्या सुटका केली होती.
वेगवेगळ्या एजन्सींवर जबाबदारी
परिवहन आणि महामार्ग मंडळाचे सचिव म्हणाले, “पाच पर्याय निश्चित करण्यात आले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी ५ वेगवेगळ्या एजन्सींना जबाबदारी देण्यात आलीय. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC), सतलुज हायड्रोपॉवर कॉर्पोरेशन (SJVNL), रेल विकास निगम लिमिटेड (RVNL), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL), आणि टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (THDCL) या पाच संस्थांना जबाबदारी सोपवण्यात आलीय.
काय आहेत ५ पर्याय
-
बोगद्यात अडकलेल्या मुजुरांची सुटका करण्यासाठी सतलज जल विद्युत निगमकडून बोगद्याच्या वरून उभ्या खोदकाम केलं जात आहे.
-
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने एका दिवसात एक अप्रोच रोड पूर्ण केलं. त्यानंतर रेल्वे विकास निगमने अत्यावश्यक पुरवठ्यासाठी दुसर्या उभ्या पाइपलाइनचे काम सुरू केलं.
-
त्यानंतर डीप ड्रिलिंगमध्ये एक्सपर्ट असलेल्या ओएनजीसीने दुसऱ्या टोकापासून व्हर्टिकल ड्रिलिंगचे काम सुरू केलंय.
-
राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास संस्थेकडून सुरक्षा व्यवस्थेवर काम झाल्यानंतर मुख्य सिल्क्यरा टोकापासून ड्रिलिंग सुरू करत राहील.
-
हे सुलभ करण्यासाठी लष्कराने बॉक्स कल्व्हर्ट तयार केलाय. मजुरांच्या संरक्षण होण्यासाठी केनोपी बनवलं जात आहे.
-
टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सूक्ष्म बोगद्यावर काम करेल. यासाठी अवजड यंत्रसामग्री जमा केली आहेत.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




