रत्नागिरी / चिपळूण: अलीकडच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका किंवा इतर कारणांमुळे अचानक उद्भवणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढताना दिसत आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात गोवळकोट येथे घडली आहे. मुंबईहून आपल्या गावी आलेल्या पंकज नथुराम कदम (वय ३० वर्षे, रा. गोवळकोट ढवळनाका, चिपळूण) या तरुणाचा संशयास्पद आणि आकस्मिक मृत्यू झाला आहे.
सत्यनारायण पूजेच्या दिवशीच घडली दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पंकज कदम हा मूळचा चिपळूणचा असून तो नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास होता. अलीकडेच तो मुंबईहून गावी आला होता. त्याचा भाऊ राकेश कदम हा देखील मुंबईहून सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने गावी आला होता. घरात पूजेची गडबड आणि आनंदाचे वातावरण असताना ही दुर्दैवी घटना घडली.
टेबलावर निपचित पडलेला दिसला भाऊ
शनिवारी दुपारपासून पंकज घराबाहेर पडला नव्हता आणि खोलीतून कोणतीही हालचाल जाणवत नव्हती. यामुळे भाऊ राकेश याने पंकजला अनेकवेळा आवाज दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी तातडीने खोलीचा दरवाजा उघडून आत पाहिले असता, पंकज हा तिथल्या एका टेबलावर निपचित अवस्थेत पडलेला दिसला. त्याची कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहून कुटुंबातील सर्व सदस्य प्रचंड घाबरले.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू
पंकज काहीही बोलत नसल्याने त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने शनिवारी संध्याकाळच्या सुमारास रिक्षाने तातडीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासताच रात्री ८ वाजेच्या सुमारास मृत घोषित केले. या आकस्मिक घटनेमुळे कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पंकजचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे अचूक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चिपळूण पोलिसांनी शवविच्छेदनानंतर व्हिसेरा (Viscera) पुढील तपासासाठी राखून ठेवला आहे. चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश महाडिक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
शहर
- ॲमिटी विद्यापीठाला १५ एकर जमीन देण्यावरून पनवेलमध्ये भूमिपुत्र आक्रमक! 'निर्णय रद्द न केल्यास नेत्यांना गावात नो एन्ट्री'चा ग्रामसभेत थेट इशारा
- पुणे-सातारा प्रवास अवघ्या एका तासात! ६,००0 कोटींचा भव्य आराखडा; खंबाटकी घाट आणि शिरवळची कोंडी फोडण्यासाठी ५ ते ६ उड्डाणपूल उभारणार
- पुण्यात ५ भावंडांचे धाडसी पाऊल! 'स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी' सोडले घर; स्वारगेट बस स्थानकात काढली रात्र, पैसे संपताच पालकांना फोन
- थरारक आणि विचित्र अपघात! वसईत भरधाव डम्पर थेट लोखंडी पुलाला धडकला; हायड्रोलिक बटण दाबल्याने डम्पर हवेत अधांतरी लटकला
महाराष्ट्र
- ॲमिटी विद्यापीठाला १५ एकर जमीन देण्यावरून पनवेलमध्ये भूमिपुत्र आक्रमक! 'निर्णय रद्द न केल्यास नेत्यांना गावात नो एन्ट्री'चा ग्रामसभेत थेट इशारा
- अमरावतीत मन सुन्न करणारी घटना! कडक उन्हात जीव गुदमरल्याने ५ दिवसांच्या नवजात बालिकेचा मृत्यू; गुपचूप अंत्यसंस्कारानंतर शवविच्छेदनातून सत्य बाहेर, आई-वडिलांवर गुन्हा दाखल
- पुणे-सातारा प्रवास अवघ्या एका तासात! ६,००0 कोटींचा भव्य आराखडा; खंबाटकी घाट आणि शिरवळची कोंडी फोडण्यासाठी ५ ते ६ उड्डाणपूल उभारणार
- उल्हासनगर गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण! पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच दोन सख्ख्या भावांचा बळी; संतप्त कुटुंबीयांचा गंभीर आरोप
गुन्हा
- यवतमाळ हादरले! गुरांची तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या तरुणाची तस्करांकडून निर्घृण हत्या; सुकळी गावात तणाव, दोघांना बेड्या
- पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना! सख्या चुलत्यासोबत २५ तोळे सोने घेऊन मुलगी पळाली; समाजात तोंड कसे दाखवू? या विवंचनेतून वडिलांनी संपवले जीवन
- सोलापुरात भाईगिरी जिरवली! तलवारीने हल्ला करून सोशल मीडियावर रील बनवणाऱ्या सैफ शेखची पोलिसांनी काढली भरचौकातून धिंड
- साताऱ्यात आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट उद्ध्वस्त! अमेरिकन नागरिकांना 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून डॉलर लुटणारे बोगस कॉल सेंटर पोलिसांकडून उद्ध्वस्त
राजकीय
- महायुतीत महामंडळ वाटपाचा तिढा सुटणार! लाल दिव्याच्या गाड्या आणि पदांचे वाटप अंतिम टप्प्यात; लवकरच होणार घोषणा!
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
इतर
- आजचे राशीभविष्य (२३ मे २०२६): 'या' राशींची नोकरी-व्यवसायात होणार प्रगती; अविवाहितांचे जुळणार लग्न!
- राज्य सरकारचा ३ महिन्यांपूर्वीचा गाजावाजा ठरला फुसका! रॉकेल पुरवठा अद्याप कागदावरच; केवळ १ रुपया कमिशनमुळे रेशन दुकानदारांची पाठ!
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
मनोरंजन
- आयपीएल २०२६ मध्ये युवा वादळ! 'ऑरेंज कॅप'धारक वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी टीनेजर फलंदाज!
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- न्यूयॉर्कमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; बसमधून खाली उतरताच अचानक आलेल्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली महिला, भीषण व्हिडिओ व्हायरल
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट उघड! इवांका ट्रम्प यांच्यावर हल्ल्याची तयारी करणारा आयआरजीसीचा दहशतवादी अटकेत
- भारत-अमेरिका संबंधात नवा अध्याय! अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारतात; पीएम मोदींसोबतच्या बैठकीत कोणता महत्त्वाचा करार होणार?
- सर्वसामान्यांना सलग झटके! १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले; इंधनाचा भडका, पाहा नवे दर!

























Subscribe to my channel




