विमान प्रवाशांच्या खिशाला कात्री! नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार; १ जूनपासून तिकिटे महागणार!

 

Navi Mumbai International Airport to start commercial flight operations on  Thursdayनवी मुंबई / मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Navi Mumbai International Airport) हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. १ जूनपासून या विमानतळावर मोठे बदल लागू केले जाणार असून, येथून प्रवास करणे आता अधिक महाग होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय विमान सेवा पूर्ण क्षमतेने सुरू केली जाणार आहे. याची सुरुवात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून होणार असून, हज यात्रेसाठी गेलेल्या प्रवाशांना मायदेशी परत आणण्यासाठी नवी मुंबई विमानतळावरून पहिले आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण करेल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जगातील इतर प्रमुख देशांसाठीची हवाई सेवा देखील येथून सुरू करण्यात येणार आहे.

तिकिटांचे दर का वाढणार? आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होत असतानाच प्रवाशांच्या खिशाला मात्र आर्थिक फटका बसणार आहे. विमानतळावर १ जूनपासून प्रवाशांच्या तिकिटांवर अतिरिक्त 'युझर फी' (User Development Fee - UDF) आकारली जाणार आहे. या नवीन विकास शुल्कामुळे विमानांच्या तिकिटांचे दर वाढणार असून प्रवासाचा खर्च वाढणार आहे. एकीकडे नवी मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय प्रवासाची थेट सुविधा मिळणार असली, तरी दुसरीकडे वाढत्या तिकिट दरांमुळे प्रवाशांना खिसा रिकामी करावा लागणार आहे.



गुन्हा

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *