इचलकरंजी (कोल्हापूर): कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध वस्त्रनगरी असलेल्या इचलकरंजी शहरात एका २५ वर्षीय महापालिका सफाई कर्मचाऱ्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवार, २० मे २०२६ रोजी सकाळी शहरातील थोरात चौक परिसरात हा प्रकार उघडकीस आला. मद्यप्राशन करत असताना झालेल्या किरकोळ वादातून हे भीषण हत्याकांड घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विकी सुरेश अग्रवाल (वय २५, रा. कामगार चाळ, सध्या शहापूर) असे मृत सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारासह तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दारू पार्टीत झाला वाद
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विकी अग्रवाल हा इचलकरंजी महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास थोरात चौकातील महापालिका मालकीच्या व्यावसायिक कॉम्प्लेक्सच्या आवारात तसेच कंजारभाट संस्कृती सभागृहासमोर विकी आणि त्याच्या ओळखीच्या काही मित्रांमध्ये मद्य प्राशन करत असताना अचानक जोरात वाद झाला. हा वाद आर्थिक देवाणघेवाणीवरून किंवा दारूच्या नशेत झालेल्या बाचाबाचीमुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
हा वाद एवढा विकोपाला गेला की, तिथल्या एका सराईत गुन्हेगाराने आपल्या इतर दोन साथीदारांसह मिळून विकीवर हल्ला केला. आरोपींनी तिथेच पडलेले सुमारे ४ मोठे सिमेंटचे दगड विकीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर एकामागून एक जोरात घातले. या भीषण हल्ल्यामध्ये गंभीर दुखापत झाल्यामुळे विकीचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून दुर्दैवी अंत झाला.
सकाळी उघडकीस आला प्रकार
बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिक आणि कॉम्प्लेक्समधील गाळेधारकांना आवारात एका तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण इचलकरंजीत मोठी खळबळ उडाली. माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण हे आपल्या फौजफाट्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूरहून फॉरेन्सिक (Forensic Team) आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
दोघे ताब्यात, मुख्य आरोपीचा शोध सुरू
गावभाग पोलिसांनी कसून तपास करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपींचा माग काढला. याप्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार आलोक सुरेश देवर्षी (रा. शांतिनगर), रिमोन धनंजय आवळे (रा. इचलकरंजी) आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत रिमोन आवळे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे, तर मुख्य संशयित आरोपी आलोक देवर्षी हा सध्या फरार असून पोलीस त्याच्या शोधात ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




