छत्रपती संभाजीनगर: लग्नात मानापानासह महागडी 'स्कॉर्पिओ' कार देऊनही सासरच्या मंडळींची हुंड्याची हाव काही मिटली नाही. "आम्हाला स्कॉर्पिओ नको, 'फॉर्च्युनर' कार पाहिजे," अशी मागणी करत सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून एका २४ वर्षीय नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दीपिका शुभम वाघ (वय २४) असे मृत विवाहितेचे नाव आहे. लग्न होऊन अवघे १४ महिने झाले असतानाच दीपिकाने हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी सिडको ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नानंतर काही दिवसांतच छळ सुरू:
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या दीपिकाचा विवाह फेब्रुवारी २०२५ मध्ये छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरातील शुभम वाघ याच्याशी झाला होता. लग्नात मुलीच्या वडिलांनी आपल्या ऐपतीप्रमाणे सासरच्यांना हुंडा आणि पांढऱ्या रंगाची 'स्कॉर्पिओ' कार भेट दिली होती. मात्र, लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पती शुभम, सासू, सासरे आणि नणंद यांनी दीपिकाला टोमणे मारण्यास सुरुवात केली.
'फॉर्च्युनर' कार आणि ५ लाखांची मागणी:
"आम्हाला स्कॉर्पिओ कार आवडली नाही, ती परत करून तुझ्या वडिलांकडून 'फॉर्च्युनर' कार मागवून घे," असा तगादा सासरच्यांनी लावला. तसेच नवीन व्यवसायासाठी माहेरून ५ लाख रुपये रोख आणण्यासाठी दीपिकावर सतत मानसिक आणि शारीरिक दबाव टाकला जात होता. दीपिकाने ही बाब आपल्या माहेरच्यांना सांगितली होती. मुलीचा संसार वाचावा म्हणून वडिलांनी सासरच्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु छळ थांबला नाही. अखेर या सततच्या त्रासाला आणि छळाला कंटाळून दीपिकाने घरात गळफास लावून आपले जीवन संपवले.
पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल, ३ जण अटकेत:
घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. मृत दीपिकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पती शुभम वाघ, सासरे, सासू आणि दोन नणंद यांच्याविरुद्ध हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पती शुभमसह ३ जणांना अटक केली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel





https://shorturl.fm/AuY29