Buldhana Horror: Father Kills Daughter and Discards Body in Drain; Accused and Son Arrested!

बुलढाण्यात बापानेच संपवलं मुलीचं आयुष्य! हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला; आरोपी पिता आणि मुलाला अटक

Buldhana Horror: Father Kills Daughter and Discards Body in Drain; Accused and Son Arrested!बुलढाणा (जळगाव जामोद): बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्या पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले असून, या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पिता आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद येथील एका नाल्यात एका तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपास चक्रे फिरवली. तपासादरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले की, मृत तरुणीच्या वडिलांनीच तिची हत्या केली होती.

हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र घरगुती वादातून किंवा रागाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात बापाला त्याच्या मुलाने (मृत तरुणीचा भाऊ) मदत केली होती. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी तरुणीचा मृतदेह जवळच्या नाल्यात फेकून दिला होता. जळगाव जामोद पोलिसांनी या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्षकच भक्षक बनल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्हयात संताप व्यक्त केला जात आहे.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *