अमरावती: सोशल मीडियावर आकर्षक वाटणारे पर्यटन स्थळ शोधणे अमरावतीतील एका तरुण गटासाठी काळ ठरले आहे. रविवारी दुपारी मार्डी रोडवरील गोडे कॉलेजसमोरील 'घातखेडा तलावात' फिरायला गेलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाला.
डबा पार्टीसाठी निवडलेले हे निर्जन ठिकाण अखेर त्यांच्या मृत्यूचे ठिकाण ठरले. काय घडली घटना?खोलापुरी गेट परिसरातील १० मुला-मुलींचा गट रविवारी दुपारी पिकनिकसाठी घराबाहेर पडला होता. यातील पायल पंडित हिनेच इन्स्टाग्रामवर सर्च करून हे १५ किलोमीटर लांब असलेले ठिकाण निश्चित केले होते.
दुपारी १:३० च्या सुमारास सर्वांनी मिळून जेवण केले आणि त्यानंतर फोटो तसेच सेल्फी काढण्यास सुरुवात केली. दुपारी २ वाजेच्या सुमारास ९ जण तलावात उतरले. याच वेळी १२ वर्षांचा आदित्य जोशी गाळात अडकून बुडू लागला.
त्याला वाचवण्यासाठी गेलेली त्याची बहीण सोनाली आणि नातेवाईक पायल व यश हेदेखील पाण्याचा अंदाज न आल्याने खोल गाळात अडकले आणि सर्वांचा मृत्यू झाला.
मृतांची नावे: सोनाली नरेंद्र जोशी (१६ वर्षे) मानव उर्फ आदित्य नरेंद्र जोशी (१२ वर्षे)पायल बबलू पंडित (२१ वर्षे/काही वृत्तानुसार १४)यश गजानन काकणे (१३ वर्षे)प्रशासनाची कारवाई:घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक रहिवासी कार्तिक मकेश्वर याने एका मुलीला (आचल) काठीच्या आधारे ओढून जीव वाचवला. जिल्हा आपत्ती निवारण दलाच्या मदतीने चौघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण खोलापुरी गेट परिसरात आणि जोशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शहर
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
महाराष्ट्र
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
























Subscribe to my channel




