पुणे: पुणे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत राजकारणातील गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. दोन आजी-माजी नगरसेविकांमधील राजकीय संघर्षाने टोक गाठले असून, भाजप नगरसेविका अर्चना पाटील आणि त्यांचे पती तुषार पाटील यांच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
बॅनर्स आणि जातीवाचक द्वेषाचा आरोप
भाजपच्याच दुसऱ्या नगरसेविका मृणाल कांबळे यांचे भाऊ बापू कांबळे यांनी ही फिर्याद दिली आहे. फिर्यादीत केलेल्या आरोपानुसार, पाटील आणि कांबळे कुटुंबातील वाद गेल्या महापालिका निवडणुकीपासून सुरू आहे. पाटील दांपत्याने केवळ जातीय द्वेषापोटी निवडणूक कार्यालयावरील बॅनर्स फाडले, कार्यकर्त्यांना धमकावले आणि विजयानंतरही घरासमोरील बॅनर्सवरून मुद्दाम वाद उकरून काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, अर्चना पाटील या एका विशिष्ट समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य करत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
अंतर्गत कलहाची दुसरी बाजू
या वादाला दुसरी बाजूही असून, यापूर्वी अर्चना पाटील यांनी देखील मृणाल कांबळे यांच्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे दाद मागितली होती. या दोन्ही नगरसेविकांमधील हा शीतयुद्ध आता थेट कायदेशीर लढाईत रूपांतरित झाल्याने पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
भाजपमधील वादांची मालिका
पुण्यातील भाजपच्या अंतर्गत वादाची ही पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वीच बाणेरमधील एका वसतिगृहाच्या कामावरून आणि त्यातील टक्केवारीवरून माजी नगरसेविका राजश्री काळे आणि विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यातील 'ऑडिओ क्लिप' आणि खडाजंगी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तो वाद शांत होत नाही तोच, आता अर्चना पाटील आणि मृणाल कांबळे यांच्यातील संघर्ष पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
याप्रकरणी खडक पोलीस अधिक तपास करत असून, पक्षाचे वरिष्ठ नेते या वादात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

