'Corporate Jihad' Exposed: Accused Confess to Heinous Crimes in Custody; Key Link Nida Khan Still Absconding

कॉर्पोरेट जिहादचा पर्दाफाश: कोठडीत नराधमांची गुन्ह्यांची कबुली; मुख्य दुवा असलेली निदा खान अजूनही फरारच

'Corporate Jihad' Exposed: Accused Confess to Heinous Crimes in Custody; Key Link Nida Khan Still Abscondingनाशिक: राज्यात खळबळ माजवणाऱ्या नाशिकमधील 'कॉर्पोरेट जिहाद' प्रकरणातील तपासाला आता वेग आला असून, अटक करण्यात आलेल्या चारही संशयितांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पोलीस कोठडीत असताना या संशयितांनी अनेक धक्कादायक कृत्यांची कबुली दिल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, याच गुन्ह्यात अटकेत असलेल्या एचआर हेड अश्विनी चेनानी हिने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

कोठडीत फुटले संशयितांचे तोंड
मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार, विनयभंग आणि बळजबरीने धर्मांतर करण्याच्या गुन्ह्यात तौसीफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी आणि रझा रफिक मेमन या चौघांना अटक करण्यात आली होती. ५ मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या काळात सखोल चौकशी दरम्यान संशयितांनी पीडित तरुणीवर केलेल्या अत्याचारांची आणि धर्मांतरासाठी दिलेल्या त्रासाची कबुली दिली आहे. मंगळवारी कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे.

निदा खानचा शोध सुरूच
या संपूर्ण प्रकरणातील मुख्य संशयित आणि पीडित तरुणी यांच्यातील प्रमुख दुवा मानली जाणारी 'निदा खान' अजूनही पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरली आहे. निदा खान हिनेच पीडितेची भेट मुख्य संशयितांशी घालून दिली होती. २ मे रोजी झालेल्या तिसऱ्या सुनावणीत न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता, मात्र ती अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या तपासात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

अश्विनी चेनानीचा जामीन अर्ज हायकोर्टात
कॉर्पोरेट जगतात महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या या रॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका निभावल्याचा आरोप असलेल्या एचआर हेड अश्विनी चेनानी हिने आता जामिनासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. या प्रकरणातील तांत्रिक बाबी आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलीस आता पुढील कायदेशीर लढाईची तयारी करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “कॉर्पोरेट जिहादचा पर्दाफाश: कोठडीत नराधमांची गुन्ह्यांची कबुली; मुख्य दुवा असलेली निदा खान अजूनही फरारच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *