मुंबई: एसटी महामंडळाच्या वतीने सवलतधारक प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या 'NCMC' स्मार्ट कार्ड विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकार आता आक्रमक झाले आहे. हे कार्ड अधिकृत दरापेक्षा जास्त किमतीला विकणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्याचे कडक निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
प्रवाशांच्या तक्रारींची गंभीर दखल
राज्यभरात ३००० हून अधिक विक्रेत्यांच्या माध्यमातून या स्मार्ट कार्ड्सचे वितरण सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी विक्रेते प्रवाशांकडून कार्डसाठी जादा पैसे उकळत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत, अवाजवी दर आकारणाऱ्या काही विक्रेत्यांचे परवाने आधीच रद्द करण्यात आले असून, इतर विक्रेत्यांनाही हा शेवटचा इशारा असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
काय आहेत कार्डचे अधिकृत दर?
महामंडळाने कार्डसाठी खालीलप्रमाणे दर निश्चित केले आहेत:
नवीन NCMC कार्ड: १९९ रुपये.
जुन्या स्मार्ट कार्डऐवजी नवीन कार्ड: १४९ रुपये.
या दरापेक्षा एक रुपयाही जास्त मागितल्यास प्रवाशांनी तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डिजीटल प्रवासाकडे एसटीचे पाऊल
एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक सुसंगत आणि पारदर्शक करण्यासाठी NCMC (National Common Mobility Card) कार्यप्रणाली लागू केली आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि 'अमृत' ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही यात समावेश केला जाणार आहे. भविष्यात सवलतधारकांसाठी हे कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार असल्याने सवलतींचा लाभ अचूक आणि डिजीटल पद्धतीने देणे शक्य होईल.
आगार व्यवस्थापकांना सतर्कतेचे आदेश
NCMC कार्डद्वारे तिकीट वितरण, टॉप-अप आणि इतर व्यवहारांसाठी एकसंध मानक कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यात आली आहे. सर्व आगार व्यवस्थापकांनी ही कार्यपद्धती काटेकोरपणे राबवावी आणि प्रवाशांना कार्ड मिळवताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेशही महामंडळाने दिले आहेत.
शहर
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- पुणे: इंद्रायणीच्या महापुरात वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय! शाळा, महाविद्यालयांसह १० इमारती तात्पुरत्या अधिग्रहित
महाराष्ट्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!


























Subscribe to my channel


https://shorturl.fm/L2BH2