पिंपरी-चिंचवड: पुणे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि महिला सुरक्षिततेच्या प्रश्नावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत अनेक महत्त्वपूर्ण मागण्या केल्या.
'शक्ती' कायद्यातील तरतुदी आता नव्या फौजदारी कायद्यात
प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या 'शक्ती' कायद्यातील अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी आता केंद्र सरकारच्या 'भारतीय न्याय संहिता' या नवीन कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ज्या गुन्ह्यांमध्ये सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे, अशा प्रकरणांत आरोपींना नोटीस देण्याची सध्याची पद्धत रद्द करून त्यांना थेट अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
म्हाळुंगे प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश
म्हाळुंगे येथे तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि खून प्रकरणाबाबत डॉ. गोऱ्हे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणाची सविस्तर माहिती त्यांनी पोलिसांकडून घेतली असून, आरोपींविरोधात लवकरात लवकर दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. चाकण परिसरात मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये झालेली वाढ पाहता पोलिसांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
परप्रांतीय कामगारांची नोंदणी आवश्यक
राज्यातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार येत असून, त्यांची अधिकृत नोंद ठेवणे सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. तसेच, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांवर पोलिसांनी सतत लक्ष ठेवावे आणि गुन्हेगारांच्या दोषसिद्धीचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
समाज माध्यमांचा वापर जबाबदारीने व्हावा
सध्या सोशल मीडियावर वाढणारी अश्लीलता आणि शोषण यावर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी देखील पुढाकार घेऊन नवीन कायद्यांबाबत समाजात जागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शहर
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- पुणे: इंद्रायणीच्या महापुरात वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय! शाळा, महाविद्यालयांसह १० इमारती तात्पुरत्या अधिग्रहित
- पुणे: मुळा-मुठा आणि भीमा नदीला महापूर! संगम-वाळकी पूल पाण्याखाली; दौंड तालुक्यात रेड अलर्ट
महाराष्ट्र
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- पुणे: इंद्रायणीच्या महापुरात वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय! शाळा, महाविद्यालयांसह १० इमारती तात्पुरत्या अधिग्रहित
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!


























Subscribe to my channel

