उल्हासनगर: शहरात गुन्हेगारांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण करणारी एक भयंकर घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर ५ मधील नेताजी चौक परिसरात शुक्रवारी दुपारी एका २१ वर्षीय तरुणावर ४ ते ५ जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याचा थरार इतका भीषण होता की, हल्लेखोरांनी मारलेल्या चाकूचे पाते तरुणाच्या पोटातच अडकून राहिले.
नेमकी घटना काय?
गणेश वाघे असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश शुक्रवारी दुपारी नेताजी चौक परिसरातून जात असताना, दबा धरून बसलेल्या ४ ते ५ अज्ञात तरुणांनी त्याला गाठले. काही कळायच्या आतच या टोळक्याने गणेशवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. यावेळी एका आरोपीने गणेशच्या पोटात जोरात चाकू खुपसला, वार इतका जोरात होता की चाकूचा हँडल तुटून पाते गणेशच्या शरीरातच अडकले.
नागरिकांची धाव आणि उपचार:
भररस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गणेशला पाहून परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्याला तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू:
या घटनेची माहिती मिळताच हीललाईन पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की अन्य काही कारणातून, याचा तपास पोलीस करत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत.
शहर
- मुंबईला कलंक! बोरिवलीत पोटच्या सावत्र मुलीवर नराधम पित्याचा अत्याचार; गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
- नात्याला काळिमा! श्रीरामपूरमध्ये मालमत्तेच्या वादातून मुलाने केली पित्याची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ
- पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना! भोरमध्ये ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; नराधम आरोपी गजाआड
- अखेर प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र बोर्डाचा १२ वीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार; 'येथे' पहा थेट लिंक
महाराष्ट्र
- खाकीला काळिमा! मुंबईत बागेत खेळणाऱ्या चिमुरडीशी अश्लील वर्तन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला बेड्या
- नागपूर हादरलं! कौटुंबिक कलह आणि नैराश्यातून माता-लेकीची टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली; नंदनवन भागातील हृदयद्रावक घटना
- आयटी हब बेंगळुरू हादरलं! महिलांच्या स्वच्छतागृहात 'हिडन कॅमेरा' लावणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक
- मुंबईला कलंक! बोरिवलीत पोटच्या सावत्र मुलीवर नराधम पित्याचा अत्याचार; गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
गुन्हा
- आयटी हब बेंगळुरू हादरलं! महिलांच्या स्वच्छतागृहात 'हिडन कॅमेरा' लावणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक
- मुंबईला कलंक! बोरिवलीत पोटच्या सावत्र मुलीवर नराधम पित्याचा अत्याचार; गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
- नात्याला काळिमा! श्रीरामपूरमध्ये मालमत्तेच्या वादातून मुलाने केली पित्याची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ
- पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना! भोरमध्ये ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; नराधम आरोपी गजाआड
राजकीय
- बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार
- पुणे शिवसेनेत (ठाकरे गट) खांदेपालट: संघटनात्मक बांधणीसाठी संजय राऊत यांचा मोठा निर्णय
- 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
- Political ; मोठी राजकीय घडामोड! ‘इतके’ आमदार भाजपात जाणार – संजय राऊतांचा मोठा दावा, राज्यात पुन्हा खळबळ
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?






















Subscribe to my channel




