पुणे: पुणे शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून एकाच दिवशी वेगवेगळ्या चार भागांत घरफोड्या झाल्याचे समोर आले आहे. चोरांनी घरांचे कुलूप आणि कडी-कोयंडे तोडून सुमारे ५ लाख ९४ हजार ४७९ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१. नऱ्हे (धायरी) येथील घटना:
शनिवारी (२५ एप्रिल) धायरी परिसरात राहणाऱ्या एका ३८ वर्षीय व्यक्तीच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरांनी आत प्रवेश केला. कपाटातील १ लाख ४९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. नऱ्हे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
२. फुरसुंगी (उरुळी देवाची) येथील घटना:
फुरसुंगी परिसरात शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ५:१५ च्या दरम्यान दुसरी घरफोडी झाली. ५२ वर्षीय घरमालक बाहेर गेल्याची संधी साधून चोरांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. लोखंडी कपाटातील तिजोरी उचकटून चोरांनी २ लाख ४ हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम पळवली.
३. लोहगाव येथील घटना:
लोहगाव भागात गुरुवारी रात्री ते शुक्रवारी दुपारी ३ च्या दरम्यान चोरी झाली. चोरांनी ३१ वर्षीय तरुणाच्या घराचे कुलूप तोडून ५४ हजार ४७९ रुपयांचा ऐवज लंपास केला. लोहगाव पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
४. वडगाव शेरी येथील घटना:
चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडगाव शेरी येथे एका ४० वर्षीय महिलेच्या घरात चोरी झाली. चोरांनी घराचा कडी-कोयंडा तोडून १ लाख ८७ हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरली. ही घटना शुक्रवार ते शनिवार दरम्यान घडली.
पुणे पोलिसांनी या सर्व प्रकरणांत तपास पथके रवाना केली आहेत. नागरिकांनी घराबाहेर जाताना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शहर
- पुण्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा मोठा प्रहार! राजस्थान कनेक्शन उघड; ११ जणांना बेड्या, ४८ लाखांचा माल जप्त
- महाराष्ट्र दिनापासून एसटीचा नवा संकल्प! 'आपली बस, आपली सेवा' अभियानाद्वारे प्रवाशांना मिळणार सुखद अनुभव
- पुणे: बुधवार पेठेत कुंटणखान्यांवर पोलिसांचा मोठा हातोडा; ४ सदनिका सील, ३ बांगलादेशी महिलांना बेड्या
- मुळशीत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! लोखंडी कठडा कारच्या आरपार; पुण्यातील तरुणाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र
- पुण्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा मोठा प्रहार! राजस्थान कनेक्शन उघड; ११ जणांना बेड्या, ४८ लाखांचा माल जप्त
- महाराष्ट्र दिनापासून एसटीचा नवा संकल्प! 'आपली बस, आपली सेवा' अभियानाद्वारे प्रवाशांना मिळणार सुखद अनुभव
- पुणे: बुधवार पेठेत कुंटणखान्यांवर पोलिसांचा मोठा हातोडा; ४ सदनिका सील, ३ बांगलादेशी महिलांना बेड्या
- अमरावती: संतापजनक प्रकार! 'तुटलेलं लग्न जुळवून देतो' असं सांगून तरुणीवर वर्षभर अत्याचार; दोघांना बेड्या
गुन्हा
- पुणे: बुधवार पेठेत कुंटणखान्यांवर पोलिसांचा मोठा हातोडा; ४ सदनिका सील, ३ बांगलादेशी महिलांना बेड्या
- अमरावती: संतापजनक प्रकार! 'तुटलेलं लग्न जुळवून देतो' असं सांगून तरुणीवर वर्षभर अत्याचार; दोघांना बेड्या
- पुण्यात खळबळ! ओळखीच्या महिलेनेच घराची बनावट चावी बनवून डल्ला मारला; १० तोळे सोने हस्तगत, २४ तासांत अटक
- शुभमंगल 'सावधान'! लग्नाचे आमिष दाखवून नवरदेवाने ४० वर्षीय महिलेला लावला २८ लाखांचा चुना; लग्नानंतर आरोपी पसार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




