
Pune : गेल्या अनेक वर्षांपासून फक्त चर्चेत असणारा पुणे ते मुंबईदरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा प्रश्न कायम आहे. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये घोषणादेखील झाली. परंतु त्याचे काम कधी सुरू होणार असा प्रश्न आहे. या दोन मार्गिका सुरू झाल्यास मार्गावरील गाड्यांची संख्यादेखील वाढवता येईल; तसेच लोकल गाड्यांनादेखील त्याचा फायदा होऊ शकतो. रेल्वे गाड्यांची संख्या वाढवल्यास रस्ते वाहतुकीवरील ताणसुद्धा कमी होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टींकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
सहा तास रेल्वे गाड्याच नाही
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सकाळच्या प्रमुख रेल्वेगाड्या सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतच उपलब्ध असून, त्यानंतर तब्बल सहा तासांचा खंड पडत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवस बाहेरून येणाऱ्या गाड्या असल्या, तरी त्या फुल्ल असतात. वाढती प्रवासी संख्या आणि कार्यालयीन ये-जा लक्षात घेता सकाळी साडेनऊनंतर किमान दर तासाला एक गाडी सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटना व नियमित प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
|
|
एसटी बसलाही प्रचंड गर्दी
पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसलादेखील कायम गर्दी असते. व्यवसाय, नोकरी, सरकारी कामासाठी मुंबईला जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. पुण्यातून मुंबईला जाण्यासाठी सकाळच्या टप्प्यात सिंहगड एक्सप्रेस (६:०५), डेक्कन क्वीन (७:१५), प्रगती एक्सप्रेस (७:४५) आणि वंदे भारत एक्स्प्रेस (९:२०) या प्रमुख गाड्या उपलब्ध आहेत. त्यानंतर पुण्यातून सुटणारी एकही गाडी दुपारी सव्वातीनपर्यंत नाही. बाहेरून येणाऱ्या काही विशेष गाड्या आहेत; पण त्यांना कायम गर्दी असल्यामुळे तिकीट मिळत नाही. दुपारनंतर डेक्कन एक्सप्रेस (३:१५), इंटरसिटी एक्सप्रेस (५:५०) आणि इंद्रायणी एक्सप्रेस (६:३५) या गाड्या आहेत. काही लांब पल्ल्याच्या गाड्या पुण्यातून जात असल्या, तरी त्यांच्या वेळा मध्यरात्र किंवा पहाटेच्या असल्याने त्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत नाहीत.
पुण्यातून सकाळी साडेनऊ ते सव्वातीन असे सहा तास मुंबईसाठी गाड्याच नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होते. त्यामुळे प्रवाशांना एसटी अथवा खासगी कॅबचाच पर्याय राहतो. त्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान खासगी व्यवसायिकांची संख्या मोठी असल्याचे दिसते. या गाड्या ‘एक्स्प्रेस वे’वरून धावत असल्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्यादेखील वाढते. त्यामुळे साडेनऊनंतर किमान एक ते दोन तासांनी मुंबईसाठी रेल्वे गाड्यांची आवश्यकता आहे. पुणे-मुंबईदरम्यानचा प्रवास साधारण तीन ते चार तासांचा असून, हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग मानला जातो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त इंटरसिटी अथवा विशेष गाड्या सुरू करून वेळापत्रकातील दरी भरून काढावी, अशी मागणी होत आहे. यामुळे प्रवास अधिक सुलभ, वेळेवर आणि सुरक्षित होईल, असा विश्वास प्रवाशांनी व्यक्त केला आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान



























Subscribe to my channel





1 thought on “Pune–Mumbai Trains : सकाळी साडेनऊ नंतर थेट ट्रेन नाही; पुणे-मुंबई प्रवाशांचे हाल, तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेची प्रतीक्षा कायम”