
Pimpri-Chinchwad : प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने आपला मुलगा आणि त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणात उत्तर चाकण पोलिसांनी तब्बल 20 दिवसांच्या तपासानंतर तिघा आरोपींना अटक केली असून, दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
त्रासाला कंटाळून हत्या
मुंजा धोंडीबा नरहरे (वय 25) याचे उषा नानासाहेब चव्हाण (वय 40, विवाहित) हिच्याशी गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मुंजा उषाला बेदम मारहाण करत होता आणि मानसिक व शारीरिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून उषा चव्हाण हिने पुण्यात कामानिमित्त आलेल्या आपला मुलगा निखिल नानासाहेब चव्हाण (वय 21) याच्याकडे आपली व्यथा मांडली. ती स्वतः चाकण येथे मुलाकडे आली. प्रियकराकडून होणाऱ्या मारहाणीची माहिती दिल्यानंतर उषा चव्हाण आणि तिचा मुलगा निखिल यांनी मुंजा नरहरेची हत्या करण्याचा कट रचला. या कटात निखिलचा मित्र स्वप्नील नरहरी पारधी यालाही सहभागी करून घेण्यात आले.
|
Pune : अपघाताच्या 6 मिनिटे आधीचा अजित पवारांचा शेवटचा कॉल समोर; संवादातील शब्दांनी वाढवली गूढता |
7 जानेवारी रोजी उषा चव्हाण हिने मुंजा नरहरे याला चाकणमध्ये भेटण्यासाठी बोलावलं. गंगाखेड येथून मुंजा चाकणला आल्यानंतर निखिल आणि स्वप्नील यांनी दुचाकीवरून त्याला सोबत घेतलं. त्यानंतर खराबवाडी येथील मद्यविक्री दुकानातून दारूच्या बाटल्या खरेदी करून बिरदवाडी येथील ओढ्याजवळील निर्मनुष्य ठिकाणी दारू पार्टी करण्यात आली. दारू पित असतानाच निखिल आणि स्वप्नील यांनी मुंजा नरहरेवर कोयत्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आला.
दारुच्या बाटल्या अन्...
ही घटना घडल्यानंतर 11 जानेवारी रोजी त्या परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती उत्तर चाकण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपास सुरू केला; मात्र आरोपींनी मृताची ओळखपत्रे आणि मोबाईल काढून घेतल्याने सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा हाती लागत नव्हता. तरीही पोलिसांनी हार न मानता सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील कंपन्यांमधील कामगारांकडे कसून चौकशी सुरू ठेवली. पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना घटनास्थळी आढळलेल्या दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या आधारे पोलिसांनी खराबवाडी येथील मद्यविक्री दुकानांमध्ये चौकशी केली.
7 जानेवारी रोजी पहाटे सहाच्या सुमारास तिघेजण दारूच्या बाटल्या खरेदीसाठी आल्याचे स्पष्ट होताच तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. पुढील तपासात गुन्ह्यात वापरलेली दुचाकी निखिलच्या मित्राची असल्याचेही निष्पन्न झाले. या संपूर्ण हत्येचा कट उषा चव्हाण आणि तिचा मुलगा निखिल यांनी रचल्याचे स्पष्ट झाले असून, उत्तर चाकण पोलिसांनी उषा चव्हाण, निखिल चव्हाण आणि स्वप्नील पारधी या तिघांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel





Turn your network into income—apply to our affiliate program!