
Baramati : पानटपरी चालकाने उधार सिगारेट न दिल्याने त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून या भांडणाचा जाब विचारणाऱ्या पिता पुत्रांवर कोयत्याने हल्ला करण्याची घटना बारामतीत घडली आहे. या घटनेत चौघे जण जखमी असून यामध्ये एक वयोवृद्ध महिला आहे. अभिषेक महादेव जगताप, महादेव विश्वनाथ जगताप, गिता महादेव जगताप, काजल महादेव जगताप (सर्व रा. सांगवी ता. बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नाव असून त्यांच्या विरोधात प्रतिक सुनील जगताप (रा. सांगवी ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीची सांगवी गावात पानटपरी असुन आरोपी अभिषेक जगताप यास उधार सिगारेट न दिल्याने त्याने शिविगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही माहिती फिर्यादीचा लहान भाऊ सार्थक जगताप यास माहित झाल्याने तो आणि फिर्यादी हे आरोपीच्या घरी त्याचे वडील महादेव जगताप यास सांगण्यासाठी गेले असता त्यांचे काही एक ऐकुन न घेता महादेव जगताप, त्याची पत्नी गिता जगताप आणि मुलगी काजल जगताप या तिघांनी शिविगाळ आणि दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीचे वडील सुनील जगताप हे भांडण सोडवण्यासाठी गेले होते.
|
|
यावेळी अभिषेक जगताप याने घरातील कोयता घेऊन सुनील जगताप यांच्या डोक्यात पाठीमागून वार केला. यावेळी आपल्या वडिलांना वाचवताना सार्थक मधे गेल्यावर त्याच्यावरही आरोपीने कोयत्याने डोक्यावर वार केला. तसेच दुसरा वार करत असताना बचाव करताना करंगळीला जखम झाली आहे. याचवेळी फिर्यादीची आजी उषा जगताप या घटनास्थळी आल्या असता त्यांना गिता जगताप आणि काजल जगताप यांनी ढकलून दिल्याने त्यांच्या हाताला लागुन त्या जखमी झाल्या आहेत.
या भांडणात कोयत्याने डोक्यावर वार झाल्याने जखमी सुनील जगताप, सार्थक जगताप, व फिर्यादीला सांगवी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढिल उपचारासाठी बारामती येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटनेचा तपास सहायक फौजदार संजय मोहिते करत आहेत.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर



























Subscribe to my channel





1 thought on “Baramati Crime : उधार सिगारेटवरून वाद; बारामतीत रक्तरंजित हल्ला, घरातून कोयता आणून केला वार, सांगवीत नेमकं काय घडलं?”