डेन्मार्कचे सार्वभौम क्षेत्र असलेल्या ग्रीनलँडवर ट्रम्प यांनीदिलेल्या हल्ल्याच्या धमकीमुळे नाटो सदस्य देशांमध्येलष्करी संघर्षाचा धोका निर्माण झाला आहे. ३२ सदस्यीयनाटो युतीच्या पाचव्या कलमानुसार, जर एखाद्या सदस्यदेशावर हल्ला झाला, तर इतर सदस्यांना त्याचे रक्षणकरावे लागते. मात्र, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यांसारखेनाटो सदस्य अमेरिकेचा मुकाबला करण्याची जोखीमपत्करणे कठीण वाटते. पण शेवटी अमेरिकेला ग्रीनलँड का हवा आहे? कारणया आर्कटिक बेटाची तीन मोठी वैशिष्ट्ये आहेत. पहिलीआर्थिक : ग्रीनलँडमध्ये मुबलक तेल आणि खनिजांचे साठेआहेत. दुसरी सुरक्षा : रशियन आणि चिनी नौदल तसेचत्यांच्या लढाऊ विमानांवर ग्रीनलँडवरून सतत लक्ष ठेवतायेते, कारण ते सातत्याने या बेटावरून प्रवास करतात.तिसरी म्हणजे वाहतूक व्यवस्था (लॉजिस्टिक) : ग्रीनलँड युरोप आणि आशिया दरम्यान कमी वेळ घेणारा आर्कटिक सागरी मार्ग उपलब्ध करून देतो. हे व्यापारासोबतच भविष्यातील लष्करी मोहिमांसाठीही महत्त्वाचे आहे. ट्रम्प म्हणतात की, अमेरिका ग्रीनलँडवर नियंत्रणमिळवेल, मग त्यासाठी कितीही कठोर मार्ग पत्करावालागला तरी चालेला. युरोपियन देश यामुळे चिंतेत आहेत. ग्रीनलँडची लोकसंख्या केवळ ५७ हजार आहे, पण तेथीललोक अमेरिकेचा भाग होण्यास विरोध करत आहेत. १८व्या शतकापासून ग्रीनलँड डेन्मार्कच्या अधिपत्याखालीआहे. डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी आपलीभूमिका स्पष्ट केली आहे की, ग्रीनलँडवर बळजबरीनेताबा मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे नाटोच्या अंताची घोषणाअसेल. नाटोमधील इतर युरोपियन नेत्यांनीहीफ्रेडरिक्सन यांना पाठिंबा दिला आहे. ब्रिटिश पंतप्रधानकीर स्टार्मर म्हणाले आहेत की, ‘ग्रीनलँडचे भविष्य तेथीललोक आणि डेन्मार्कच ठरवेल.’ पण ट्रम्प यांनी युरोपचेआक्षेप फेटाळून लावले आहेत. त्यांना अमेरिका-युरोपयुती तुटण्याची फारशी काळजी नाही, जी दुसऱ्यामहायुद्धानंतर पश्चिमेकडील सर्व भू-राजकीय सिद्धांतांचापाया राहिली आहे. ट्रम्प यांच्यासाठी अमेरिकन आणिकॅरिबियन क्षेत्रातील पश्चिम गोलार्धाचे महत्त्व अटलांटिकमहासागरापलीकडील जुन्या युरोपपेक्षा कितीतरी जास्तआहे. भू-भागांवर जबरदस्तीने ताबा मिळवण्याचाअमेरिकेचा मोठा इतिहास आहे. अमेरिकेत आलेल्यासुरुवातीच्या ब्रिटिश वसाहतवाद्यांनी तिथे शतकानुशतकेराहणाऱ्या मूळ अमेरिकन लोकांच्या जमिनी बळकावल्याहोत्या. स्वातंत्र्यानंतर अमेरिकेने १८४६-४८ मध्येमेक्सिकोसोबत युद्ध करून कॅलिफोर्निया आणिटेक्साससह त्यांची अर्धी जमीन ताब्यात घेतली होती.तत्पूर्वी १८०३ मध्ये अमेरिकेने फ्रान्सकडून लुईझियानाआणि १८६७ मध्ये रशियाकडून अलास्का विकत घेतलेहोते. अशा परिस्थितीत ग्रीनलँडवर ताबा मिळवणे हेत्यांच्या वसाहतवादी मानसिकतेचाच एक भाग आहे. अमेरिका आणि युरोपमधील ऐतिहासिक संबंधकमकुवत होणे भारतासाठी भू-राजकारणाचे नवीन पर्यायखुले करते. २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठीअर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे. भारताची ६० कोटीमध्यमवर्गीय ग्राहकांची बाजारपेठ अमेरिका आणियुरोपियन युनियनच्या एकत्रित ग्राहक बाजारपेठेपेक्षाहीमोठी आहे. चीनमधील महत्त्वाच्या तांत्रिक उद्योगांमधूनबाहेर काढल्या गेलेल्या आणि अमेरिकेत मोठ्या आयातशुल्काचा सामना करणाऱ्या युरोपियन कंपन्यांसाठीभारताची ही अवाढव्य बाजारपेठ एक आकर्षक संधीआहे. जरी भारतीय ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमतासध्या मर्यादित असली, तरी त्यांचे खर्च करण्यायोग्यउत्पन्न इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या ग्राहकांच्या तुलनेतवेगाने वाढत आहे. आज जेव्हा ग्रीनलँडवरून अमेरिका-युरोप युती तुटतआहे, तेव्हा भारताने या संधीचा फायदा घेत १ फेब्रुवारीच्याकेंद्रीय अर्थसंकल्पात सीमा शुल्कात आणखी सवलतीद्यायला हव्यात. या निर्णायक टप्प्यावर आर्थिक सुधारणांचावेग अधिक वाढवला जाण्याची गरज आहे.
(हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत) आज जेव्हा ग्रीनलँडवरून अमेरिका आणियुरोपमधील पाश्चात्य युती तुटत आहे,तेव्हा भारताने या संधीचा फायदा घ्यायलाहवा. आपण येत्या १ फेब्रुवारी रोजी सादरहोणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात सीमाशुल्कात आणखी सवलती देऊ शकतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या १६० बसेस धावणार
महाराष्ट्र
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
गुन्हा
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- पुण्यात कौटुंबिक वादातून भयानक टोकाचं पाऊल! आरवी परिसरात २५ वर्षीय विवाहितेची पतीने केली निर्घृण हत्या; नराधम पतीला बेड्या
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

पुण्यातील पाटील इस्टेट परिसरात सराईत गुन्हेगाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
ठाकरे गट आणि काँग्रेसच्या संभाव्य राजकीय समीकरणांबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधान केलं आहे.
पुणे-सातारा महामार्गावर टेम्पोची जोरदार धडक Pune Accident | पुणे-सातारा
देश विदेश
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'

























Subscribe to my channel

