माझे एक मन असे म्हणू इच्छिते की, ‘धन्यवाद मिस्टरट्रम्प, तुम्ही भारतासोबत व्यापार करार करणे सातत्यानेटाळाटाळ करत आहात!’ कारण तुम्ही तसे केले नसते,तर १९९१ नंतर आतापर्यंत झाल्या नव्हत्या अशामहत्त्वाच्या आर्थिक सुधारणा इतक्या वेगाने झाल्यानसत्या. उदाहरण म्हणून नवीन कामगार कायदेच घ्या. सरकारने यापूर्वी नवीन भूसंपादन विधेयक, कृषीकायदे हे मागे घेतले होते आणि जोखीम टाळण्यासाठीकामगार कायदे बासनात गुंडाळून ठेवले होते. आर्थिकप्रशासनाच्या बाबतीत, उदाहरणार्थ सरकारी बँकांच्याताळेबंदाची स्वच्छता, त्यांचे सक्षमीकरण आणिदिवाळखोरी कायदा इत्यादी बाबतीत काही सुधारणानक्कीच झाल्या. परंतु यादरम्यान ‘सरकारच माय-बाप’असणारा संरक्षणवाद पुन्हा परतला. आयात शुल्कात वाढझाली आणि गुणवत्ता नियंत्रण आदेशाच्या रूपाने एकमोठी नॉन-टेरिफची सुरक्षा भिंत उभी केली गेली. भारतीयउद्योगातील गटांनी यासाठी लाॅबिंग केले व ते प्राप्तही केले. अत्यंत हुशार भारतीय सनदी सेवांच्या अंतर्गत गटानेचहे तयार केले असावे. ट्रम्प बहुधा भारताच्या याच नॉनटेरिफ अडथळ्यांचा उल्लेख करत होते. वास्तविक,त्यांची वेळ आता संपली आहे. आता हे अडथळे घाईनेनसले तरी सावधपणे दूर केले जात आहेत. अनुभवीआणि विश्वासू अधिकारी या परतीच्या प्रकल्पाला पुढे नेतआहेत. देव त्यांना अधिक शक्ती देवो! पण, ट्रम्पसाहेब तुमचे पुन्हा एकदा आभार. आभार मृदुभावासाठीनाही, तर असा अहंकार दाखवण्यासाठी की तुम्ही एकाअत्यंत महत्त्वाच्या धोरणात्मक संबंध केवळ एकाहट्टासाठी खराब करून घेतले. कुणी तुम्हाला फोन केलाहोता की नाही! ट्रम्प नसते, तर व्यापारापासून तोंडफिरवणाऱ्या आपल्या सत्तायंत्रणेला व्यापार कराराची जादू समजली नसती. आता तर ब्रिटन आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेसोबतचा व्यापार करार आपल्या खिशातआहे. युरोपियन युनियनसोबतही करार होणार आहे. चीन वगळता प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारीचाजवळपास प्रत्येक सदस्य देश आता सोबत आला आहे. यानंतर व्यापाराबाबत भारताचा विचारही बदलला आहे. म्हणूनच मिस्टर ट्रम्प, तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद! ७% आर्थिक विकास दरासोबत नगण्य महागाई दर,त्याला हिंदुत्ववादी राष्ट्रवाद व लोककल्याणकारीयोजनांच्या कार्यक्षम वितरणाची जोड, यामुळे एकजबरदस्त निवडणूक फॉर्म्युला तयार होतोच. मग आपली नौका जोखमीत कशाला टाकायची? पण ट्रम्प यांनी आपल्याला आठवण करून दिली की सावधपणे खेळणेहा आता पर्याय उरलेला नाही. त्यामुळे स्कोअर वाढवा,मग जोखीम काहीही असो! ट्रम्प व्यापाराला आपल्या धोरणाचे हत्यार बनवतीलअशी अपेक्षा होतीच. पण भारत असा अंदाज लावूशकला नाही की ते आयात शुल्काचा वापर एखाद्याशस्त्रासारखा करतील. खरं सांगायचं तर, बाकी जगालाहीयाचा अंदाज आला नव्हता. भारत व्यापाराबाबत सर्वातजास्त समाधानी आणि उदासीन होता. आपला असासमज झाला होता, की ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातदोन्ही देशांचे संबंध धोरणात्मक हितांनी सुरळीत सुरूराहतील. परंतु याउलट ही धोरणात्मक बाजू आपल्यासाठीतेव्हा उलटली, जेव्हा ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानपुन्हा एकदा व्हाईट हाऊसच्या जवळ पोहोचला. मोदीआणि ट्रम्प यांच्यातील सौहार्दाचे जे काही थोडे पाणीउरले होते, ते ‘माझा नोबेल पुरस्कार कुठे आहे?’ याउष्णतेत वाफ होऊन उडून गेले. भारत त्यांच्या नावाचीशिफारस तर करूच शकत नव्हता, पण आपण पाकलाधडा शिकवण्यापूर्वीच त्यांना भानावर आणण्यासाठीआणि युद्धविरामाचा मार्ग सुकर करण्यासाठी ट्रम्प यांचेआभार मानण्याचा विचार नक्कीच करता आला असता.हे नाकारणे ही धोरणात्मक चूक होती. माझे दुसरे मन ही गोष्ट मान्य करते की, हे जे संकट सुरूआहे, ते कशा प्रकारे कमी पगाराच्या लाखो नोकऱ्यासंपवत आहे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार देणाऱ्यामत्स्यपालन, कपडा उद्योग, हिरे आणि दागिने यांसारख्याक्षेत्रांचे नुकसान करत आहे. आतापर्यंत ही क्षेत्रे काहीप्रमाणात सरकारच्या मदतीने आणि काही अंशी आपल्याआजवरच्या गतीने तग धरून आहेत. परंतु आणखी तीनमहिने उलटल्यानंतर या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कपातहोऊ शकते. त्यामुळे भारत हे जास्त काळ सहन करूशकत नाही. यावर उपाय शोधावेच लागतील. याचा अर्थ असा नाही की भारताने ट्रम्प यांची गयावयाकरावी, ज्याची अपेक्षा ते जिनपिंग आणि पुतीन सोडूनजगातील प्रत्येक नेत्याकडून ठेवतात. पण भारत त्याअनेक प्रकरणांत लवचिक भूमिका घेऊ शकतो. जे विषयट्रम्प यांच्यासाठी संवेदनशील आहेत. उदाहरणार्थ, त्यांचीशेती क्षेत्रातील लॉबी. मला माहीत आहे की भारतात याचानैसर्गिक विरोध या भीतीमुळे होतोय की, यामुळे भारतीयशेती उद्ध्वस्त होईल किंवा येथे जनुकीय बदल केलेल्याउत्पादनांचा महापूर येईल, ज्यावर भारताने बंदी घातलीआहे (जी मी पूर्वीपासूनच अयोग्य मानत आलो आहे). आक्रमक न होताही मार्ग काढला जाऊ शकतो. जरापाहा, ढाका येथील अमेरिकन दूतावास तिथे केवळ५८,००० टन मक्याच्या आयातीवर किती आनंदी आहे. हाकोंबड्यांचा चारा आहे. भारत प्रामुख्याने कोंबड्यांसाठीएकूण चाऱ्याची आयात करतो. केवळ इथेनॉलबनवण्यासाठी किंवा चाऱ्यासाठी मका आयात करण्यातकाय अडचण आहे? आता असे म्हणू नका की, आम्हीआमच्या कोंबड्यांना जनुकीय बदल केलेला चारा खाऊघालू शकत नाही. अशा कापसाची सरकी आपल्याजनावरांचा मुख्य चारा आहे. आणि त्यापासून काढलेजाणारे तेल आपल्या अन्नसाखळीत गेल्या २३ वर्षांपासूनअस्तित्वात आहे. संपूर्ण जग ट्रम्प यांना हाताळण्याचे उपाय शोधत आहे.आतापर्यंत तुम्हाला त्यांच्या पद्धती आणि शैलीसमजलीच असेल. कोणताही गाजावाजा न करता त्यांनाकाही बिनधोक विजयांचे श्रेय घेऊ दिले जाऊ शकते.थोडा आवाज होऊ शकतो आणि संघर्षही होऊ शकतो,जसा इंदिरा गांधी आणि निक्सन यांच्यात झाला होता. पणतो काळ वेगळा होता. तेव्हा शीतयुद्ध शिगेला पोहोचलेहोते. आज जग बदलले आहे आणि हा नवा भारत आहे.आज भारत आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्या अमेरिकाआणि जागतिक व्यवस्थेशी मोठ्या प्रमाणावर जोडलागेला आहे. अशा परिस्थितीत ठोस आर्थिक सुधारणा पुढेन्या, कारण असे संकट पिढ्यांवर एखाद्या वेळीच येते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) अशी संधी क्वचितच येते...आज जग बदलले आहे आणि हा नवा भारत आहे.आज भारत आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्याअमेरिका आणि जागतिक व्यवस्थेशी मोठ्याप्रमाणावर जोडला गेला आहे. अशा परिस्थितीतठोस आर्थिक सुधारणा पुढे न्या, कारण असे संकटपिढ्यांमध्ये एखाद्या वेळीच येते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




