जालना: लाचखोर तहसीलदारावर एसीबीचा 'सर्जिकल स्ट्राईक'जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी (६ जून २०२६) सायंकाळी बीड एसीबीच्या विशेष पथकाने छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी सापळा रचून ही कारवाई केली.
नेमके प्रकरण काय? अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या वाळू उपशाशी हे प्रकरण संबंधित आहे. वाळू वाहतूक करणारे ट्रक आणि पोकलेन मशीनवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांनी तक्रारदाराकडे महिन्याकाठी मोठ्या रकमेची मागणी केली होती. ही रक्कम लाच म्हणून देण्यास तक्रारदाराने नकार देऊन बीड एसीबीकडे धाव घेतली. एसीबीचा सापळा आणि अटक:तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बीड एसीबीच्या पथकाने शनिवारी छत्रपती संभाजीनगरमधील चव्हाण यांच्या राहत्या घराबाहेर सापळा रचला.
तक्रारदाराने जशी ६ लाख ४० हजार रुपयांची लाच विजय चव्हाण यांच्या हाती दिली, तसे तिथे दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. या कारवाईनंतर त्यांच्या मुकुंदवाडी आणि सिडको परिसरातील मालमत्तांचीही तपासणी सुरू करण्यात आली.
वादग्रस्त कारकीर्द: तहसीलदार विजय चव्हाण हे त्यांच्या कारकिर्दीत अनेकदा वादात राहिले आहेत. यापूर्वीही त्यांना एका जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात शासनाने निलंबित केले होते. तसेच, वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेल्यावर त्यांच्यावर हल्ला होण्याचा प्रयत्न झाला होता, त्यावेळी त्यांनी स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केल्याची घटनाही चर्चेत होती.
स्वतः कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची भाषा करणारे चव्हाण आता लाचखोरीच्या आरोपाखाली अडकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहर
- पुणे: हिंजवडी मेट्रोचे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; बालेवाडीतील मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित!
- पुणे: उभ्या आयुष्यात कधी रक्ताची बाटली दिली नाही अन् त्यांना आमदार करायचं; पुण्यात निकालाआधी शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची भाजप उमेदवारावर जोरदार आगपाखड!
- नाशिक: पंतप्रधान मोदींना जेवढ्या शिव्या देतील, तेवढे ते खड्ड्यात जातील नाशिक दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल!
- मुंबई: "देवेंद्र आबा..." दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी चिमुरडीने पिगी बँकेत साठवलेले पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला केले दान!
महाराष्ट्र
- रायगड: महायुतीत वाद पेटला! सुनील तटकरे मला संपवण्याची सुपारी देण्याचा प्रयत्न करत आहेत; शिंदेसेनेच्या आमदार महेंद्र थोरवेंचा खळबळजनक आरोप!
- पुणे: हिंजवडी मेट्रोचे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; बालेवाडीतील मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित!
- पुणे: उभ्या आयुष्यात कधी रक्ताची बाटली दिली नाही अन् त्यांना आमदार करायचं; पुण्यात निकालाआधी शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची भाजप उमेदवारावर जोरदार आगपाखड!
- नाशिक: पंतप्रधान मोदींना जेवढ्या शिव्या देतील, तेवढे ते खड्ड्यात जातील नाशिक दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: विधानसभा निवडणूक २०२७ आमदार नसलेल्या मतदारसंघांत भाजपची नवी रणनीती, मित्रपक्षांवरील अवलंबित्व घटवण्याचा मास्टरप्लॅन!
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात


























Subscribe to my channel




