
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सीबीआय अधिकारी असल्याचं भासवून तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आरोपीने सीबीआय ( CBI ) अधिकारी असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाला मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवण्याचा दावा केला. तसेच मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची भीती दाखवत तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी काही मोबाईल क्रमांक आणि बँक खात्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चिंचवड येथील शिवाजी पार्क परिसरात राहणारे 77 वर्षीय अशोक कृष्णा सराफ यांना आरोपींनी फोन करून संपर्क साधला. सुरुवातीला आरोपींनी स्वतःची ओळख टेलिफोन विभागातील अधिकारी अशी करून दिली. त्यानंतर सर्व्हिलन्स अधिकारी आणि पुढे सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत सराफ यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला.
आरोपींनी सराफ यांना त्यांच्या नावावरील कॅनरा बँकेच्या खात्याचा वापर नरेश गोयल यांच्यावरील ईडी (ED) कारवाईशी संबंधित मनी लाँड्रिंगसाठी झाल्याचा बनाव केला. यामुळे त्यांना अटक होऊ शकते, अशी भीती दाखवत मानसिक दबाव टाकण्यात आला.
|
|
‘डिजिटल अरेस्ट’ची भीती निर्माण करून आरोपींनी सराफ यांना त्यांच्या बँक खात्यातील तसेच म्युच्युअल फंडातील रकमेची ‘लीगल व्हेरिफिकेशन’ (वैधता तपासणी) करायची असल्याचे सांगितले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रक्कम परत केली जाईल, असे आश्वासन देत सराफ यांना ठराविक बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आले.
या फसवणुकीत सराफ यांनी एकूण 1 कोटी रुपये ट्रान्सफर केले. मात्र, रक्कम पाठवल्यानंतर आरोपींनी संपर्क तोडला आणि कोणतीही रक्कम परत मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सराफ यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २०५, ३०८(१), ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(सी) आणि ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शहर
- पुणे: नीरा शहरात एटीएम फसवणुकीचा सुळसुळाट; बँका आणि यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
- चंद्रपूर: बिबट्याचा थरार; कुत्र्याचा पाठलाग करत घरात शिरला आणि झोपलेल्या पती-पत्नीवर केला हल्ला
- मुंबई: ओव्हरटेक करण्याच्या वादातून फिटनेस ट्रेनरच्या गाडीची तोडफोड; वांद्रे तलाव परिसरात हाणामारी
महाराष्ट्र
- नवी मुंबई: "मुलीवर जास्त प्रेम करतेस" म्हणून मुलाने जन्मदात्या आईची केली निर्घृण हत्या
- सातारा: रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सातारा जिल्ह्यात खळबळ
- पुणे: नीरा शहरात एटीएम फसवणुकीचा सुळसुळाट; बँका आणि यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
गुन्हा
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
- पुणे: रक्ताचा नातेसंबंध सरला: कौटुंबिक वादातून चुलत्याने केला पुतण्या आणि सासऱ्याचा खून, महंमदवाडीत खळबळ
- पुणे: पोलीस भरतीचे स्वप्न भंगले, अकॅडमीतील शिक्षकाच्या मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणीची आत्महत्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.


























Subscribe to my channel




Hello https://is.gd/tvHMGJ