Maharashtra Politics : पुण्यात राजकीय भूकंप; पालिका निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्याचा भाजपकडे कल

Maharashtra Politics : महानगर पालिका निवडणुकीदरम्यान पुण्यात मोठी राजकीय घडामोड घडताना दिसत आहे. पुण्यामध्ये भाजपकडून सुरू असलेल्या ऑपरेशन लोटसला यश मिळताना पाहायला मिळत आहे. पिंपरी- चिंचवड शहरात भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला. बड्या नेत्याने शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकला असून ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीदरम्यान भाजपची ताकद वाढली आहे.

शिवसेना शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले संजोग वाघेरे पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. ते आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे त्यांचा प्रवेश होणार असून पिंपरी गाव येथून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. संजोग वाघेरे यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील भाजपचे कमळ हाती घेणार आहेत. त्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे महापालिका निवडणुकीदरम्यान शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Mumbai : तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की धक्का? कोर्टात नेमकं काय घडलं

नुकताच संजोग वाघेरे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर वाघेरे हे भाजपात प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. आज ते भाजपात दाखल होत आहेत. पिंपरी- चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रवेशामुळे शहरात भाजपाची ताकदीमध्ये मोठी वाढणार आहे.

संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे महापौर पद भूषवले आहे. महापालिकेत नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पद तसेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती. गेल्यावर्षी मावळची लोकसभा निवडणूक देखील त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून लढवली होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *