पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले

पुणेः मतदानासाठी पैशांचे वाटप करण्यात आले. तसेच शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कौस्तुभगावडे यांनी गमछा घालून मतदान केंद्रात प्रवेश केला. त्यामुळे गावडे यांनी आचारसंहितेच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप शिंदेसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांनी केला.

शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर, शिंदेसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांच्या तर पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता जाधव तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदानाच्या वेळी शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी पक्षाचा गमछा घालून मतदान केंद्रात प्रवेश केला व मतदान केले. या सर्व प्रक्रियेत त्यांना कोणत्याही यंत्रणेने अडविले नाही. गावडे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप सचिन सानप यांनी केला. भोर येथील एका केंद्रावर पैसे वाटप करत असल्याचा आरोपही सानप यांनी केला.

मतदानावेळी 'स्पायकॅम पेन' वापरल्याचा आरोप
या निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटपासाठी स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मतदारांच्या खिशाला असे पेन लावून, भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि मतदानानंतर तो दाखविल्यावर ठरलेले पैसे द्यायचे, असा प्रकार सुरू असल्याचे मतदार सांगत आहेत. मतदानाचा गोपनीयतेचा आणि मतदारांचे स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या य प्रकाराची निवडणूक आयोगाने व शासनाने तातडीने दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर केली आहे.


बारामतीत पैसे वाटपाचा आरोप
बारामती शहरातील पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच महायुतीकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. बारामतीच्या उपनगराध्यक्षांचे पती योगेश नाळे हे या प्रकारामुळे चर्चेत आले आहेत. योगेश नाळे हे मतदारांना पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बारामतीत हा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, व्हिडिओच्या सत्यतेबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, बारामती शहरातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूल येथे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. याच ठिकाणी हा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी योगेश नाळे यांनी सांगितले की, मी पैसे वाटप करत नव्हतो. मतदान केंद्राबाहेर स्लीप वाटण्याचे काम करणारे कार्यकर्ते यांच्यासाठी चहा-नाष्ट्याची सोय म्हणून कार्यकर्त्याला पैसे देत होतो. त्यावेळी हा व्हिडिओ काढल्याचे नाळे म्हणाले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *