
Pune : पुण्यातील गेल्या दशकभरापासून रखडलेल्या कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने या प्रकल्पाच्या अंतिम निवाडा प्रस्तावास मंजुरी दिल्याने पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरातील दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा आणि मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक सहन करणारा हा महत्त्वाचा मार्ग भूसंपादनाच्या अडचणींमुळे दीर्घकाळ प्रलंबित होता. मात्र, पुणे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयातून तयार करण्यात आलेला भूसंपादन प्रस्ताव मंत्रालयातील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या रस्त्याच्या प्रगतीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मंजुरीनंतर आता सरकारची औपचारिक मान्यता मिळाल्यावर भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
या प्रकल्पात सुमारे ३.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १२९ मिळकतींमधील अंदाजे ५२,६३० चौरस मीटर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा मुख्य रस्ता, दोन्ही बाजूंना सेवा रस्ते, पावसाळी जलवाहिनी तसेच माऊलीनगर परिसरात ग्रेड सेपरेटरचा समावेश असेल.
दरम्यान, राजस चौक येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत (NHAI) उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामालाही या प्रकल्पामुळे गती मिळणार आहे. उड्डाणपुलाच्या उतारासाठी आवश्यक असलेल्या सुमारे ४०० मीटर सर्व्हिस रोडचे काम सुरू असून त्यातील काही भाग पूर्ण झाला आहे.
सध्या कात्रज–कोंढवा मार्गावर दररोज १५,००० हून अधिक वाहने धावतात. त्यात अवजड वाहनांचे प्रमाणही लक्षणीय आहे. पर्यायी मार्गांचा अभाव असल्याने बोपदेव घाट आणि दिवे घाटातून येणारी वाहतूकही याच मार्गावर येते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते.
हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा मार्ग जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. अंतिम विकास आराखड्यात हा रस्ता ८४ मीटर रुंदीचा प्रस्तावित आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- कोल्हापुर: लपंडाव खेळताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श होऊन ९ वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




