
Pune : शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा, भूसंपादनाची कामे मार्गी लागावीत यासाठी महापालिकेने मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी अभय योजना सुरु केली आहे. या योजनेस एक महिना होत आला, पण त्यातून केवळ १५७ कोटी रुपये वसूल झाले आहेत. मोठे थकबाकीदार अजूनही पैसे भरण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच मिळकतकर विभागाकडूनही थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जात नसल्याने ही योजना फसण्याच्या मार्गावर आहे.
पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प १२ हजार कोटीच्या पुढे गेला आहे. पगार आणि देखभाल दुरुस्तीवर मोठा खर्च होत असल्याने भांडवली विकास कामांना पुरेसा निधी मिळत नाही अशी स्थिती आहे. पुणे शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे, विकास आराखड्यातील रस्ते अस्तित्वात येण्यासाठी भूसंपादन आवश्यक असले तरी त्यासाठी निधीची कमतरता आहे. तसेच सांडपाणी व्यवस्थापन, पाणी पुरवठा प्रकल्प पूर्ण करणे, नवीन उद्याने, रुग्णालय, शाळा उभारणे यासाठीही निधी लागणार आहे. पण त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही.
|
|
मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी मिळकती जप्त करणे, टाळे ठोकणे, त्यांचा लिलाव करणे अशा उपाययोजना महापालिका राबवत असते. पण त्यातून वर्षाला १००-१५० कोटी पेक्षा जास्त रक्कम जमा होत नाही. मिळकतकराची एकूण थकबाकी १३ हजार कोटी रुपये आहे, यातील न्यायालयीन प्रकरणांमध्ये सुमारे ३ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. पण उर्वरित जागा मालक थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. वाढत जाणारी थकबाकी कमी करणे, विकास कामासाठी निधी वसूल करणे यासाठी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत 'अभय योजना' राबविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये थकबाकीवर ७५ टक्के सवलत दिली जात आहे.
प्रतिसाद वाढविण्यासाठी नियमात बदल
महापालिकेने यापूर्वी चार वेळा अभय योजना राबविली आहे. त्यातून ६३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. अभय योजनेचा लाभ घेणाऱ्यांकडून पुन्हा पुन्हा थकबाकी निर्माण केली जात असल्याने चालू अभय योजनेत त्यांना लाभदेणार नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, अभय योजनेला प्रतिसाद खूप कमी असल्याने त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी पूर्वी लाभ घेतलेल्यांना पुन्हा अभय योजनेत सहभागी होण्याची सवलत देण्यात आली आहे.
शहर
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- पुणे: पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा! मनसे नेते अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांची घणाघाती टीका
महाराष्ट्र
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- जालना: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात उद्या जालना, बीड, परभणी आणि लातूर कडकडीत बंद; काय सुरू आणि काय राहणार बंद?
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात



























Subscribe to my channel




