
Nagpur : राज्य विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आज रविवारी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून विरोधी पक्षांनादेखील या चहापानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चहापानाच्या कार्यक्रमावर नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांच्यासह इतर नेत्यांनी आज महाविकास आघाडीच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून का बहिष्कार टाकत आहोत? याबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे.
|
Mumbai : भाजप vs शिवसेना आमने–सामने! एकाच कुटुंबातील दोन उमेदवारांमुळे राजकीय वातावरण तापलं |
"आम्ही चहापानाच्या कार्यक्रमाला का जात नाही आहोत? याबाबत विजय वडेट्टीवार यांनी सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. आम्हाला राज्याचे प्रमुख म्हणून सभागृह नेते म्हणून तसेच राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला चहापानाला या म्हणून पत्र पाठवलं आहे. त्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी भास्करराव जाधव आमदार असं लिहिलं आहे. त्यापुढे लिहिलं आहे की, आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. आता ते कुठल्या अधिकारात पत्र पाठवतात? तर ते राज्याचे प्रमुख म्हणून आम्हाला पत्र पाठवतात. तशाच पद्धतीने विरोधी पक्षाचा प्रमुख कोण आहे?", असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
"दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही आणि आम्ही विरोधी पक्षांना चहापानाला बोलवलं आहे असं सांगायचं, पण विरोधी पक्षनेता पदाची दोन्ही पदं खाली ठेवायची. पर्यायाने ही पदं केवळ शासन निर्णयात किंवा पर्यायाने पुढे आलेली नाहीत. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जी घटना आहे त्या घटनेमध्ये विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे, त्याच्या निवडीची पद्धत नियमात सुद्धा आहे. तथा परंपरेमध्ये सुद्धा आहे", असा दावा भास्कर जाधव यांनी केला.
"एकूण सदस्यसंख्येच्या 10 टक्के सदस्यसंख्या असल्याशिवाय विरोधी पक्षनेता निवडता येत नाही, असं सांगितलं जायचं. पण हे साफ खोटं आहे. याचे सगळे पुरावे आम्ही विधीमंडळाला दिले. सचिव आणि अध्यक्षांना दिले. आम्ही त्यांच्याकडून विरोधी पक्षनेताचे नियम आणि कायदेशीर प्रक्रिया काय आहे हे लिखीत स्वरुपात मागितली. त्यानंतर अखेर प्रधान सचिवांना पत्र द्यावं लागलं", अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली.
"अशा पद्धतीने कुठेही सदस्य संख्येची अट विरोधी पक्षनेत्याच्या निवड प्रक्रियेत नाही. ज्या पक्षाचे सदस्य जास्त, त्या पक्षाच्यावतीने जे विरोधी पक्षनेता करता नाव येईल त्याच्या नावाची घोषणा अध्यक्षांनी करावी, असं उत्तर त्यांनी आम्हाला दिलं. विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहाच विरोधी पक्षनेता पद खाली आहे. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात विधी मंडळात आजतागायत हा पहिला प्रसंग निर्माण झाला आहे", अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
- "आम्हाला निधी देत नाहीत, अशांसोबत चहा कसा पिणार?", असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
- "लाडकी बहीण, लाडका भाऊ खड्ड्यात गेले, आता लाडका कंत्राटदार आला", अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुनही सरकारवर टीका केली.
- "सकाळ, संध्याकाळ लोकप्रतिनिधी विकत घेण्याचं काम सुरु आहे", असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी महायुतीवर केला.
- "शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन मत घेतलं, पण आता कर्जमाफीसाठी तरीख पे तारीख दिली जात आहे", अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
शहर
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
महाराष्ट्र
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू


























Subscribe to my channel




