
Pune : मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार मुंबई-सोलापूर या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला दौंड स्थानकावर थांबा मिळाला आहे. येत्या २४ नोव्हेंबरपासून दररोज ही गाडी दौंड स्थानकावर थांबणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या नागरिकांच्या मागणीला आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यांसोबत साताऱ्यातील फलटण खटाव, सोलापूर जिल्ह्यातील कर्माळा, माढा, माळशिरस पट्ट्यातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने सोलापूर – मुंबई मार्गावर १० फेब्रुवारी २०२३ पासून वंदे भारत एक्सप्रेस सुरु केली. प्रवाशांच्या दृष्टीने सुलभ प्रवास होत असला,तरी पुणे शहरालगत असलेल्या दौंड, बारामती, इंदापूर, तसेच साताऱ्यातील फलटण, खटाव, सोलापुरातील करमाळा येथील स्थानिकांना या मार्गावर प्रवास करण्यासाठी थेट सोलापूर किंवा पुणे स्थानक गाठावे लागत होते. दौंड हे पुणे-सोलापूर पट्ट्यातील मध्यवर्ती ठिकाण झाले आहे, त्यामुळे आता प्रवाशांना दौंड येथून वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करता येणे सहज शक्य होणार आहे.
|
|
सोलापुर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास अवघ्या पावणे सात तासांचा ( ६.४५) प्रवास झाला आहे. विशेषतः दौंड – भिगवण- फलटण या भाग औद्योगिकदृष्ट्या महत्वाचा मानला जोता. त्याचबरोबर दौंड तालुक्यात असलेले साखर कारखाने वैद्यकी क्षेत्रातील कंपन्यांमुळे उद्योजक, व्यवस्थापक, अभियंते यांना मुंबईला त्वरेने जाता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे उद्योग, कृषी क्षेत्रालाही मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे फायदा होणार आहे.
पुणे ते दौंड-सोलापूर या मार्गावर डीझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनीट (डेमू) धावत असून शिक्षण, व्यवसाय, नोकरीनिमित्त या मार्गावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, वारंवार निर्माण होणारे तांत्रिक बिघाड, विलंब यामुळे स्थानिकांनी वंदे भारत एक्सप्रेसला दौंड स्थानकाचा थांबा द्यावा अशी मागणी दीड ते दोन वर्षांपासून लावून धरली होती. तसेच मधल्या काळात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही रेल्वे मंत्री आश्विनि वैष्णव यांची भेट घेऊन वंदे भारत एक्सप्रेसला दौेंड स्थानकावर थांबा द्यावा, अशी मागणी केली होती. अखेर या मागणीला यश आले आहे.
अशी आहे वेळ
- मुंबई – दौंड – रात्री ८.१३ मिनिटांनी आगमन, ८.१५ वाजता प्रस्थान
- सोलापूर ते दौंड – सकाळी ८.०८ आगमन, ८.१० वाजता प्रस्थान
रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेच्या निर्देशानुसार सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस २४ नोव्हेंबरपासून दररोज दौंड स्थानकावर थांबणार आहे. इतर थांब्यांच्या नियोजीत वेळा वेळापत्रकानुसार कायम राहतील. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. – योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर विभाग.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




