
Pune News : पुण्यामध्ये भरधाव कारच्या धडकेमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील कल्याणीनगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे. पार्टी करून घराच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला भरधाव कारने धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. येरवडा पोलिसांनी १७ वर्षीय कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारस ही घटना घडली आहे. भरधाव कारने दुचाकीला चिरडले. विना नंबर प्लेट महागडी कार भरधाव चालवत तरुणाने दुचाकीला धडक दिली. या विचित्र अपघातात एका तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ब्रम्हा सनसिटीमध्ये राहणाऱ्या वेदांत अगरवालने आपल्या भरधाव कारने एका दुचाकीसह अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेमध्ये तरुण आणि तरूणीचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री पार्टी करून कार चालवणाऱ्या वेदांतने मद्यधुंद अवस्थेत दोघांचा जीव घेतला
|
Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीची तयारी सुरु, पाऊस-पाणी पाहून नियोजन करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश |
पुणे शहरातील अनेक पब्स रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. अपघातामध्ये मृत्यू झालेले तरुण आणि तरुणी हे आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी संपल्यानंतर अडीचच्या सुमारास घरी परत जात होते. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर पोहचताच भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले होते.
या घटनेनंतर काही तरुणांनी कारचालकाला पकडले आणि मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारचालकाला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या अपघातामध्ये अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. निष्काळजीपणाने भरधाव वेगाने कार चालवल्यामुळे ही घटना घडली. मृत्यू झालेल्या तरुण-तरुणींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता शनिवारी रात्री उशिरापर्यंत पब्स पुन्हा सुरु असल्याचे दिसून येते.
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!































Subscribe to my channel




